Navra Navri Sulka : नाशिकच्या पहिने नवरा-नवरी सुळक्यावर यशस्वी चढाई, माथ्यावर फडकवला तिरंगा ध्वज

जानेवारी महिन्यात नवेले यांनी कोल्हापूर आणि मुंबई येथील दोघा क्लायम्बर्सच्या बरोबरीने चार सुळके सर केले.
Navra Navri Sulka Trimbakeshwar Nashik
Navra Navri Sulka Trimbakeshwar Nashikesakal
Updated on
Summary

अवघड पॅच, सैल दगड, उभी कठीण चढाई, मातीची घसरण आणि मधमाश्‍यांचा हल्ला या परिस्थितीला तोंड देत त्यांनी हे आव्हान पूर्ण केले.

रत्नागिरी : रत्नागिरीतील (Ratnagiri) जिद्दी माउंटेनिअरिंगचे क्लांयबर्स (प्रस्तरारोहक) अरविंद नवेले यांनी मंगेश बाळू कोयंडे आणि अमोल अळवेकर यांच्या साथीने त्रिंबकेश्वर रेंजमधील हे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अवघड श्रेणीतील पहिने नवरा, पहिने नवरी, डांग्या असे ३ सुळके सर केले तर संडे १ हा सुळका अर्ध्यापर्यंत सर केला.

अवघड पॅच, सैल दगड, उभी कठीण चढाई, मातीची घसरण आणि मधमाश्‍यांचा हल्ला या परिस्थितीला तोंड देत हे आव्हान पूर्ण केले. रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंगचा तरुण क्लायबर्स अरविंद नवेले विविध ठिकाणचे उंच सुळके सर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जानेवारी महिन्यात नवेले यांनी कोल्हापूर आणि मुंबई येथील दोघा क्लायम्बर्सच्या बरोबरीने चार सुळके सर केले.

Navra Navri Sulka Trimbakeshwar Nashik
कोल्हापूर-सांगली महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप लटकलेलंच; मंत्री नितीन गडकरींच्या घोषणेचं काय झालं?

याबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘पहिल्या दिवशी लक्ष्मणपाडा येथील लोकांशी चर्चा करून पहिने नवरा सुळक्याचा क्लायबिंग रूट आणि वाटेची रेकी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुळका चढण्यास सुरुवात केली. ६० फुटांचा पहिला पॅच मी पार केला. उघड्या पुस्तकरचनेतील पॅच आणि मातीची घसरण असा ८० फुटांचा दुसरा पॅच क्लायबिंग करताना मधमाश्‍‍या घोंगावत अंगावर आल्या. आम्ही सगळ्यांनी चेहरा झाकून घेतला. एक तास मधमाश्‍‍या आमच्या बाजूला वावरत होत्या.

थोडेसे अवघडलो कारण, एकाच ठिकाणी इतक्या उंचावर एकाच पोझिशनमध्ये थांबलो होतो; पण ही आमची परीक्षेची वेळ होती जी देव आणि निसर्ग घेत होता. तब्बल एक तासाने मधमाश्‍‍यांचे वादळ शांत झाले आणि पुढचे प्रयत्न सुरू केले. चार तासांनी पहिने नवरा सुळका सर केला. दुपारी सुळक्यावरून रॅपलिंग करत पायथा गाठला. त्यानंतर एक तास आराम करून थोडा अवघड असा पहिने नवरी सुळका चढण्यास सुरुवात केली. अडथळे पार करत साडेचार तासांनी पहिने नवरी सुळक्याच्या माथ्यावर पोहचलो. तिथे तिरंगा ध्वज, स्वराज्याचा जरीपताका फडकवला आणि रॅपलिंग करत सायंकाळी सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो.

Navra Navri Sulka Trimbakeshwar Nashik
बहुजन समाजातील माणसाचं भलं करण्यासाठी राजकारण करणारी आम्ही मंडळी आहोत - अजित पवार

त्रिंबकेश्वरला मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी संडे १ सुळका चढण्यास आरंभ केला. सकाळी संडे १ सुळका क्लायबिंगला सुरुवात केली. १४० फुटांचे अंतर पार केले. मधमाश्‍‍यांनी हल्ला केल्यामुळे रॅपलिंग करत खाली आलो. मधमाश्यांच्या त्रासामुळे संडे २ सुळक्याच्या माथ्यावर पोचता आले नाही. चौथ्या दिवशी डांग्या सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो. उघड्या पुस्तकासारखे अवघड पॅच, सैल दगड, उभी कठीण चढाई आणि मातीची घसरण असे एकामागोमाग एक टप्पे पार करून २३० फुटांची चढाई ३ तासांत करून माथा गाठला. दुपारपर्यंत सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो.

Navra Navri Sulka Trimbakeshwar Nashik
मोठी बातमी! शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार? 'महाविकास आघाडी'कडून तिकीट मिळण्याची शक्यता

सुळक्यांची उंची

१४० फूट

पहिने नवरा

१४० फूट

पहिने नवरी

१४० फूट

संडे १

२३० फूट

डांग्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.