Mandangad Farmer : पडिक जमिनीत फुलविला हिरवागार भाजीचा मळा; जोशी कुटुंबीयांचा यशस्वी प्रयोग

तुळशीतील गंगाराम जोशी व सुयोग जोशी या पिता-पुत्रांनी शेती भाजीपाला लागवडीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे.
Joshi Family Tulsi Village
Joshi Family Tulsi Villageesakal
Updated on
Summary

हिरवागार फुललेला मळा पाहून रस्त्याने जाणारे अनेक प्रवासी थांबून मळ्यातील भाजीपाला खरेदी करत आहेत.

मंडणगड : पावसानंतर पडिक राहणाऱ्या शेतात विविध प्रकारची भाजीपाला लागवड करून तुळशी येथील जोशी पिता-पुत्रांनी (Joshi Family) हिरवागार मळा फुलविला आहे. एकरात भाजीपाला लागवड केली असून, धरणातून निचरा होऊन वाहत जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग केला आहे. स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचालीचे चित्र आश्वासक आहे.

तुळशीतील गंगाराम जोशी व सुयोग जोशी या पिता-पुत्रांनी शेती भाजीपाला लागवडीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. त्याला घरातील महिलांची साथ मिळत आहे. शेतात त्यांनी कोबी, कोथिंबीर, वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी, गवार, काकडी, वाटाणा, कारली, कलिंगड, माट, मेथी, पावटा, चवळी, काळा आणि हिरवा मूग, भोपळी मिरची, मुळा अशा अनेक प्रकारची लागवड केली आहे.

Joshi Family Tulsi Village
शिवाजी विद्यापीठात 57 वर्षांपूर्वीच वाल्मिकी ऋषींच्या 'रामायणा'वर झाले संशोधन; कथेची वेगळ्या भूमिकेतून केली पाहणी

तुळशी धरणातून कालव्याद्वारे निचरा होणाऱ्या ग्रॅव्हिटी पाण्यात ८०० मीटर पाईपलाईन टाकून हे पाणी उताराने आपल्या शेतात आणले आहे. पॉवरटिलरच्या साहाय्याने नांगरणी करून खतासाठी आपल्या गोठ्यातील शेणखताचा वापर केला आहे. पूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात येत आहे.

Joshi Family Tulsi Village
ऐतिहासिक दसरा चौकात उभारली प्रभू श्रीरामांची तब्बल 108 फुटी भव्य प्रतिमा; मंत्री पाटील, महाडिकांच्या उपस्थितीत आज अनावरण

हिरवागार फुललेला मळा पाहून रस्त्याने जाणारे अनेक प्रवासी थांबून मळ्यातील भाजीपाला खरेदी करत आहेत तसेच गावात अनेक वाड्या असून, गावातच त्यांच्या भाजीपाल्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे जागेवरच त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पूर्ण एकरात मळ्याच्या संरक्षणासाठी करवंदीचे काटेरी कुंपण बांधले आहे. जोशी यांचे कुटुंब दिवसभर शेतात राबत असून, त्यांच्या परिश्रमाला उत्पादनाच्या रूपाने फळ मिळण्यास सुरवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.