Sawantwadi : हृदयद्रावक! अंगावर वडाचे झाड कोसळून महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार

कनिष्ठ महाविद्यालयातून (Junior College) घरी जात असताना वडाचे झाड अंगावर कोसळून युवती जागीच ठार झाली.
Junior College student
Junior College studentesakal
Updated on
Summary

तळवडे बाजार पेठेतील एका विद्यालयात बारावीमध्ये शिकत असलेली सायली व तिच्या दोन मैत्रिणींसह महाविद्यालय सुटल्यानंतर घरी येत होत्या.

सावंतवाडी : कनिष्ठ महाविद्यालयातून (Junior College) घरी जात असताना वडाचे झाड अंगावर कोसळून युवती जागीच ठार झाली, तर अन्य दोघी बचावल्या. सायली सतीश धुरी (वय १७, रा. मिरिस्तेवाडी) असे तिचे नाव आहे. ही घटना तळवडे येथे काल (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी : सध्या मुसळधार पावसासह वाराही सुरू आहे. कालही पाऊस होता. तळवडे बाजार पेठेतील एका विद्यालयात बारावीमध्ये शिकत असलेली सायली व तिच्या दोन मैत्रिणींसह महाविद्यालय सुटल्यानंतर घरी येत होत्या.

त्या मिरीस्तेवाडी येथील घराच्या अगदीजवळ आल्या. रस्त्यालगत असलेल्या जुन्या वठलेल्या वडाच्या झाडाखालून त्या जात होत्या. याच दरम्यान वाऱ्याने ते महाकाय झाड कोसळले. याच्या खाली सायली सापडली. तिच्या मैत्रिणींनी मात्र प्रसंगावधान राखत बाजूला धाव घेतली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.