सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश; असे आहेत नियम

निर्बंध कायम; पॉझिटीव्हीटी दर जास्त असल्याने निर्णय
Corona Lockdown
Corona Lockdownesakal
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्‍ह्यात कोविड बाधित रुग्णांचा आरटीसीआर चाचणीतून मिळालेला पॉझिटीव्हीटी दर अधिक असल्याने तो कमी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात सुरू असलेले प्रभावी निर्बंध पुढेही लागू राहतील, असे आदेश आज दिले आहेत. त्यामुळे कोरोनाचा सुरू असलेल्या निर्बंधात कोणतीही सूट मिळालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढले.

Summary

पॉझिटीव्हीटी दर अधिक असल्याने तो कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात सुरू असलेले प्रभावी निर्बंध पुढेही लागू राहतील, असे आदेश काढले.

जिल्ह्यात आरटीपीसीआर दर पाच टक्के पेक्षा जास्त असल्याने जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे. परिणामी राज्य शासनाने राज्यातील ११ जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवत अन्य जिल्ह्यांत सूट दिली आहे. निर्बंध असलेल्या जिल्ह्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी निर्बंधाबाबत आज नव्याने आदेश काढले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत ते अन्य दुकाने व व्यवस्थापने शनिवार व रविवारी बंद राहणार असून इतर दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाटयगृह व अन्य करमणूकीची ठिकाणे बंद राहतील. रेस्टॉरंट्स, हॉटेल्‍स, होम स्‍टे, खानावळ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसन क्षमतेुनसार प्रत्यक्ष तर सायंकाळी ४ नंतर पार्सल सेवा चालू राहील व शनिवार आणि रविवार फक्‍त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील.

सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत आणि खाजगी आस्थापना, कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ४ जूनच्‍या निर्देशानुसार वगळण्‍यात आलेल्‍या सर्व आस्‍थापना जसे खाजगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था व गैर बॅंकीग वित्‍त संस्‍था कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील; मात्र शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) ५० टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्‍थापना, मान्‍सुनपूर्व कामांशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. मोकळ्या जागेत सकाळी ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत खेळ सुरू राहणार आहेत.

Corona Lockdown
कोल्हापूरच्या डाॅक्टरांचा राज्यपालांकडून गौरव

चित्रीकरणाला सुरक्षित आवरणामध्‍ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, करमणूकीचे कार्यक्रम सोमवार ते शक्रवार सभागृह हॉल आसन क्षमतेच्‍या ५० टक्के उपस्थितीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत घेता येणार असून लग्नसमारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत व अंत्ययात्रा-अंतविधी जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे. बैठका, निवडणूक -स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा, सभागृह, हॉल आसन क्षमतेच्‍या ५० टक्के लोकांच्‍या उपस्थितीत घेण्यास परवानगी आहे. फक्‍त बांधकाम साईटवर निवासी, वास्‍तव्‍यास मुभा आहे. कृषि व कृषि पुरक सेवा संपूर्ण आठवडाभर सायंकाळी ४ पर्यंत सुरु राहतील. ई कॉमर्स वस्तू व सेवा नियमित पूर्णवेळ दररोज सुरू राहतील.

जमावबंदी, संचारबंदी कायम असून ५ पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तीस एकत्र येण्‍यास मज्‍जाव आहे. सायंकाळी ५ नंतर फक्‍त अत्‍यावश्‍यक कामांसाठी मुभा आहे. व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत क्षमतेच्‍या ५० टक्के पूर्व परवानगीसह विना एसी सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) पूर्ण आसन क्षमतेने सुरू राहील; परंतू प्रवाशांना उभ्‍याने प्रवास करण्‍यास मनाई आहे. माल वाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक, मदतनीस, स्वच्छक किंवा इतर प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.