कळणेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; नदी प्रदूषित

काल सकाळपासून सुरु झालेला प्रवाह अद्याप सुरुच आहे.
कळणेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; नदी प्रदूषित
Updated on

कळणे : येथील खाणीतील खनिज मिश्रित पाणी पात्रात गेल्याने नदी प्रदूषित झाली आहे. काल सकाळपासून सुरु झालेला प्रवाह अद्याप सुरुच आहे. या नदीच्या पाण्यावर दोन नळपाणी योजनाच्या जॅकवेल आहेत. प्रदूषित पाण्यामुळे कळणेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील पाण्याच्या नमुन्यांची तातडीने तपासणी करण्याची गरज आहे. प्रदूषित पाण्याचा आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

कळणेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; नदी प्रदूषित
'आम्ही आमच्या कामाला लागणार तुम्ही तुमच्या'

कळणेतील खाण आयर्न ओर व मँगेनीज या खनिजची आहे. खाणीत साठविण्यात आलेल्या पाण्यात खनिज मिसळलेले होते. शिवाय अचानक बांध फुटल्याने पाण्यासोबत खनिजही वाहून गेले. हे प्रदूषित पाणी कळणे नदीच्या पात्रात मिसळले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. पाण्याचा रंग पूर्णतः बदलून गेला आहे. घटनेच्या २४ तासानंतरही खाणीतील पाणी सुरूच आहे. खाणीत पावसाचे पाणी जमा होत राहणार आहे. त्यामुळे प्रदूषित पाणी सुरूच राहील. या नदीवर कळणे गावची मुख्य नळपाणी योजना व करमळी येथील योजनेच्या जॅकवेल आहेत. यामधील पाण्याचा रंगही बदलून गेला आहे.

टीसीएलवर अवलंबित्व

ग्रामपंचायतींकडे कोणतेही वॉटर ट्रीटमेंट प्लांट नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी केवळ टीसीएल पावडरचा वापर केला जातो. ही बाब शुद्धीकरणासाठी पुरेशी आहे का हे तातडीने तपासण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.