कणकवली कोविड सेंटरमध्ये ३३६ रूग्‍णांवर मोफत सेवा

नगराध्यक्ष समीर नलावडे : शासनाने परवानगी दिली तर पुन्हा केंद्र सुरू करणार
kankavli
kankavlisakal
Updated on

कणकवली : कोरोना साथ आटोक्यात येत असल्याने शासनाच्या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ३३६ रुग्णांवर उपचार केले. तर येथे गेल्या साडे तीन महिन्यात एकाचाही मृत्यू झाला नाही. आता तिसरी लाट आल्यास आणि शासनाने परवानगी दिल्यास आम्ही पुन्हा कोविड सेंटर चालू करण्याची आमची तयारी आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगराध्यक्ष दालनात श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोविड केअर सेंटरबाबत माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, नगरसेवक अभिजित मुसळे, शिशिर परुळेकर, विराज भोसले, महेश सावंत, किशोर राणे, अजय गांगण आदी उपस्थित होते.

kankavli
अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याचा टेबलच काढला; निफाडमध्ये कारवाई

श्री.नलावडे म्‍हणाले, ``कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर कणकवली शहरात कोविड सेंटर आम्‍ही सुरू केले. १६ मे रोजी या केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. तर शासन आदेशानुसार ३१ ऑगस्टला ते बंद करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचा आदेश आले असल्‍याने ते बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र या कोविड सेंटरच्या माध्यमातून १७ मे ते ३१ ऑगस्टपर्यत ३३६ रुग्णांवर उपचार केले. दाखल झालेले सर्व रुग्ण ठणठणीत आहेत, आमच्या कोविड सेंटर मध्ये एकही रुग्ण दगावला नाही.``

ते म्‍हणाले, ``गेल्‍या साडेतीन महिन्याच्या कालावधीत या केंद्रामध्ये १२ डॉक्टरांनी सेवा दिली. तसेच ४ नर्स, २ वार्डबॉय यांनीही चांगली सेवा दिली. कोविड सेंटर चालू झाल्‍यानंतर दानशूर व्यक्ती, त्यात्यासाहेब मुसळे ट्रस्ट, रोटरी क्लब ,उद्योजक यांनी मदत केली. थर्मल गण,बीपी मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन या मशीन दिल्या आहेत. रोटरी क्लबने जम्बो सिलेंडर, ३३६ वेलकम किट दिले, साज ग्रुप तर्फे जम्बो किट, विद्यामंदिर दहावी बॅच कडून मदत, केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट मास्क, सँनिटायझर, राजु मानकर ,संजय कामतेकर, उद्योगपती प्रशांत तेंडुलकर यांनी गोळ्यांचे किट दिले.``

kankavli
कणकवलीत बंद खोलीत किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यात खलबत्तं!

या कालावधीत मुख्याधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत,नगरसेवक सर्वांनी एकत्रित काम केले. डॉ.तायशेट्ये यांनी सेवा दिली. तर आमदार नितेश राणे यांनी केंद्र सुरू होण्यासाठी परवानगी मिळण्याची मेहनत घेतली, आमदार प्रसाद लाड यांनी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन दिले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष ,प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी व जेवण पुरवठा श्री.आचरेकर या सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच आम्ही यशस्वी कोविड सेंटर चालवू शकलो असे समीर नलावडे म्‍हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()