नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
कणकवली : नारायण राणे (narayan rane) यांच्या वक्तव्याने शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादाच्या ठिणगीचा परिणाम आज कणकवली शहरातही उमटला आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास शिवसेनेच्या (shivsena) कार्यकर्त्यांनी श्रीधर नाईक चौकांमध्ये नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात जमलेल्या पोलिस पथकाने हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली (kanakavli) शहरांत याची ठिणगी पडण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी दंगल नियंत्रण दोन पोलिस पथके आज सकाळपासून तैनात ठेवली होती. तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते कणकवलीच्या विभागीय शिवसेना शाखेमध्ये जमा झाले.
आज सकाळी अकरा वाजेपर्यंत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुढची रणनीती सुरू झाली. दुपारी बाराच्या सुमारास नरडवे नाक्यावर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना प्रमुख शैलेश गावडे, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, जि. प. सदस्य स्वरूपा विकाळे, अजय सावंत, संतोष परब, बंडू ठाकूर, रमेश चव्हाण, सुजित जाधव यांच्यासह 20 ते 25 शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश होता.
मुख्य चौकांमध्ये महामार्गाच्या उड्डाणपुला खाली पुतळा जाळण्यासाठी अचानकपणे जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमुळे पोलिसांची धांदल उडाली. मात्र परिसरामध्ये दोन पोलिसांच्या गाड्या होत्या. शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत पुतळा हातातून काढून घेतला. यानंतर शिवसेना कार्यकर्ते कार्यालयाकडे परतले. या प्रकरामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.