Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

Kokan: मंत्री केसरकरांचे स्वप्न भंग करा ; ठाकरे गटाला सूचना

Published on

जनतेची मतदारांची खोटी आश्वासने व घोषणा देऊन फसवणूक करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांचे चौथ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंग करा, पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या दरबारामध्ये यांचा खोटारडेपणा उघड करा, अशा प्रकारच्या सूचना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी येथे पदाधिकाऱ्यांना केल्या.

Deepak Kesarkar
Shivsena: आमदार अपात्रतेसंबंधी सलग सुनावणी; ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची साक्ष पूर्ण, कालच्या सुनावणीवेळी काय घडलं?

येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. तब्बल दोन तास बंद दाराआड चाललेल्या या बैठकीमध्ये शिवसेना विभाग प्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह युवा सेना तालुका व उपजिल्हा संघटक महिला संघटक यांची स्वतंत्र बैठक भेट घेण्यात आली.

Deepak Kesarkar
Shivsena: CM शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब, युवासेना जिल्हाप्रमुख सागर नाणोसकर आदींसह सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये बांदा विभागचे अशोक परब, संदीप पांढरे, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, राजु शेटकर, युवा सेना तालुका संघटक गुणाजी गावडे, मायकल डिसोजा, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, संदीप माळकर, आबा केरकर, आबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Deepak Kesarkar
Asim Sarode on Shivsena MLA Disqualification: आमदार अपात्रतेची वादळी सुनावणी संपताच, ठाकरेंचे वकील सरोंदेंचा घणाघात

यावेळी दुधवडकर म्हणाले, की ‘‘मंत्री केसरकर यांनी केलेल्या अनेक घोषणा फोल, फसव्या ठरल्या. त्यांनी एकही विकासात्मक काम अद्यापही मतदारसंघांमध्ये पूर्ण केलेले नाही. तरीही ते चौथ्यांदा पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे गटामध्ये केसरकर गेले असले तरी त्यांचा कोणताही फरक शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पडलेला नाही. एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या दरबारात जाऊन केसरकर यांना धडा शिकवावा.’

पदाधिकाऱ्यांची झाडाझडती
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्कप्रमुखदुधवडकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नियोजनार्थ संवाद साधला. सावंतवाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी चांगलीच सर्वांची झाडाझडती घेतली. शिवाय प्रत्येकाला जबाबदारीची जाणीवही करुन दिली.

Deepak Kesarkar
Shivsena: आमदार अपात्रतेसंबंधी सलग सुनावणी; ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची साक्ष पूर्ण, कालच्या सुनावणीवेळी काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.