Kokan News: चिपळूणमधील पोफळी भागातील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोफळीतील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत
Kokan News Arrange alternative water supply to the villages of Pofali area in Chiplun
Kokan News Arrange alternative water supply to the villages of Pofali area in Chiplun SAKAL
Updated on

चिपळूण, ता. २७ : पोफळीतील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात यासंदर्भात पाहणी होणार आहे.

कोयना प्रकल्पाच्या बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या चार गावच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी महानिर्मिती कंपनी आणि जलसंपदा विभागाला केली आहे.


कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम महिनाभरात सुरू होणार आहे. यासाठी १९ नोव्हेंबरपासून कोयनेच्या टप्पा १, २ ची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. पोफळी येथील ईव्हिटीतून पोफळीसह कोंडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे गावच्या नळपाणी योजनेसाठी पाणी आणण्यात आले आहे. त्याशिवाय महानिर्मिती कंपनीच्या कर्मचारी वसाहतीला ईव्हिटीतूनच पाणीपुरवठा होतो. गळतीचे काम करताना टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद झाल्यानंतर कोयना धरणातून पोफळी ईव्हीटीकडे येणारे पाणी बंद केले जाणार आहे. त्यामुळे या भागाला पाणी मिळणार नाही.
एक वर्षापूर्वी गळती काढण्याबाबत जलसंपदा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या त्याचवेळी संबंधित ग्रामपंचायतींना जलसंपदा विभागाने पत्र पाठवून पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली होती. आता १९ नोव्हेंबरपासून कोयनेचा टप्पा १ आणि २ बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी पर्यायी उपायोजना करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामस्थांची बैठक झाली. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर आज जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, आमदार शेखर निकम, महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार व इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चार गावातील संभाव्य पाणीटंचाईबद्दल तोडगा काढण्यासाठी पर्याय सुचवण्यात आले. चार गावांसाठी नवीन पाईपलाईन टाकून पाणी आणायचे झाले तर त्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च आहे. दोन महिन्यात गळतीचे काम पूर्ण होईल; पण नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम होणार नाही. त्यामुळे जुन्या योजना चालू करता येणे शक्य आहे का किंवा कोयना प्रकल्पाच्या इतर स्रोतामधून पाणी देणे शक्य आहे का, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तपणे पाहणी करावी, असे बैठकीत ठरले.

Kokan News Arrange alternative water supply to the villages of Pofali area in Chiplun
Sai Lokur: मुलगा की मुलगी? कोण येणार सईच्या घरी? डोहाळेजेवणाचा व्हिडीओ व्हायरल

कोट
पोफळी परिसरातील चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अन्य पर्याय कोणते आहेत, या संदर्भात पुढील आठवड्यात महानिर्मिती कंपनी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी संयुक्त पाहणी करतील. त्यानंतर पुढील निर्णय घेऊन त्याचा अहवाल सरकारला दिला जाईल.
--नितीन पोतदार, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग कोयना

Kokan News Arrange alternative water supply to the villages of Pofali area in Chiplun
Actress Babilona: प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाऊ आढळला मृतावस्थेत, पोलिसांना घरात सापडली 'ही' गोष्ट


कोट
कोयनेच्या बोगद्यातील गाळती काढण्याचे प्राथमिक नियोजन करा; मात्र चार गावांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करा. त्यानंतरच या भागातील पाणीपुरवठा बंद करा, अशी सूचना महानिर्मिती कंपनीला केली आहे. ती महानिर्मिती कंपनी व जलसंपदा विभागाने मान्य केली आहे. त्यामुळे पर्यायी पाण्याची व्यवस्था झाल्यानंतरच या भागातील पाणीपुरवठा बंद केला जाईल.
- शेखर निकम, आमदार, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.