Kokan News : उच्चशिक्षित तरूण रमलाय शेताच्या बांधावर

जापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील हनुमंत शिरीष विचारे या तरूणाने त्याला फाटा दिला आहे
Kokan News
Kokan Newsesakal
Updated on

राजापूर : निसर्गाची अवकृपा आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी आदी विविध कारणांमुळे शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून शेतीक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यातून, तरूणांचाही शेतीकडे ओढा कमी दिसतो. त्यामुळे उच्च शिक्षण घेवून गलेलठ्ठ पगाराची उच्चपदस्थ नोकरी करण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र, राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील हनुमंत शिरीष विचारे या तरूणाने त्याला फाटा दिला आहे. नवोदय विद्यालयामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर मुंबई येथे इंटेरिअर डिझायनिंगचा कोर्स केलेल्या या तरूणाने गेली दहा वर्ष विविध प्रकारची शेती करीत त्यामध्ये मिळविलेले लक्षवेधी यश तरूणांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी म्हणावे लागेल.

Kokan News
Pregnancy Travel Tips : गरोदरपणात प्रवास करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

घरातूनच शेतीतील बाळकडू

आई स्मिता-वडील शिरीष यांच्यासमवेत लहानपणापासून शेती करताना त्यांच्याकडून शेतीचे बाळकडू मिळाल्याचे हनुमंत सांगतात. त्यातून शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला जाण्याऐवजी गावी राहून शेती करण्याचा मानस होता. त्यासाठी शेतीतील नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान याची यु-ट्युबवरील व्हिडीओंमधून माहिती घेतली. त्याचवेळी दैनिक अ‍ॅग्रोवनसह शेतीविषयक पुस्तकांच्या वाचनामधून मिळालेल्या महत्वपूर्ण माहितीमधून शेतीतील रूची अधिक वाढली. दैनिक अ‍ॅग्रोवनसह शेतीविषयक पुस्तकांच्या वाचनामधून मिळालेली माहिती शेती करण्यासह यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे हनुमंत सांगतात.

Kokan News
Monsoon Travel Guide : बॅग भरो और निकल पडो! पावसाळ्यातील Holidays स्पेशल बनवतील ही ठिकाणे!

नदीकाठावरील पडीक जमिन ओलिताखाली

अर्जुना नदीच्या काठावरील अनेक गावांमधील शेतजमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये भातशेती केली जात असली तरी, उन्हाळ्यामध्ये नदीला मुबलक प्रमामाणात पाणी उपलब्ध असूनही या जमिनीमध्ये शेतकर्‍यांकडून कोणतेही पिक घेतले जात नाही. त्यातून, नदीच्या काठावरील अनेक गावांमधील शेतजमिनी उन्हाळ्यामध्ये कोरड्या ठणठणीत दिसतात. मात्र, जिद्दीला मेहनेतीची जोड देत आणि शेतीतून समृद्धीचा ध्यास घेत हनुमंत यांनी उन्हाळ्यात कोरडी अन् पडीक असलेली जमीन ओलिताखाली आणली आहे. त्यासाठी आई स्मिता, वडील शिरीष, भाऊ महेश आणि मित्रपरिवाराचे सहकार्य लाभल्याचे ते सांगतात.

Kokan News
Air Travel : विमान प्रवास मंदावला! प्रवासी संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली; तिकीटही स्वस्त

आंतरपिक प्राधान्य

उन्हाळ्यामध्ये पडीक असलेल्या सुमारे साडेतीन एकर जागेमध्ये हनुमंत याने चार-पाच वर्ष सातत्याने कलिंगड, कोबी, फ्लॉवर, हळद आदी प्रमुख पिके तर, आंतरपिक म्हणून मक्याचे पिक घेतले. त्यासाठी लागणार्‍या पाण्यासाठी काठावरील अर्जुना नदीच्या पाण्याचा त्याने खुबीने उपयोग केला. शेतीतील फारसा अभ्यास नसला तरी, घरातून लहानपणापासून शेतीचे मिळालेले बाळकडू आणि नवनवीन शिकण्याची अन् माहिती घेण्याच्या वृत्तीतून मिळालेल्या माहितीच्या जोरावर शेतीच्या खताची मात्रा, किड-रोग नियंत्रणासाठी औषध फवारणी आणि पाणी पुरवठा याचे सुयोग्य नियोजन केले. त्याच्यातून ‘ऑगस्ट’ जातीचे तब्बल 14 किलो वजनाचे कलिंगड तयार झाले होते. शेतामध्ये पिकणार्‍या पिकाच्या विक्रीसाठी फारशा बाजारपेठेचा शोध घ्यावा लागला नाही. परिसरातील गावांमध्ये पिकाला जादा मागणी आहे.

Kokan News
Traveling Tips : फिरायला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'या' पर्यटनस्थळांवर पाऊस कमी होईपर्यंत असणार आहे बंदी!

नाविण्यपूर्ण रेशीम शेती

गेले वर्षभर कलिंगड, कोबी, फ्लॉवरची उन्हाळ्यामध्ये शेती करीत नसला तरी पावसाळ्यामध्ये हळद, भातशेती, काकडी, मिरची आदी पिके आजही शेतामध्ये घेत आहेत. त्याच्याजोडीने तुती लागवडीच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण रेशीम शेती करण्याला त्याने प्राधान्य दिले आहे. अर्जुना नदीच्या काठावरील सुमारे दिड एकर जागेमध्ये त्याने तुती लागवड केली आहे. सरी पद्धतीने तुतीच्या रोपांची लागवड करताना तण काढण्यासह पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन केले आहे. पाणीपुरवठ्यासाठी शेतामध्ये कायमस्वरूपी पाईपलाईन घातली आहे. शेतातील विविध कामांसाठी मजूर करण्याऐवजी हनुमंत स्वतःच राबतो. त्यातून, उच्चशिक्षित तरूणाचे हात प्रत्यक्ष शेतामध्ये राबत असल्याचे काहीसे अनोखे चित्र त्याच्या शेतामध्ये सार्‍यांना पहायला मिळते.

Kokan News
Traveling Tips : फिरायला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'या' पर्यटनस्थळांवर पाऊस कमी होईपर्यंत असणार आहे बंदी!

ऊस लागवड

पश्‍चिम महाराष्ट्राच्या काळ्या मातीमध्ये घेतले जाणारे ऊस पिक गेल्या काही वर्षापासून कोकणातील शेतकर्‍यांकडून घेतले जात आहे. हनुमंत याने भाऊ महेश, मुकेश, सचिन, योगेश यांच्यासह सुमारे सहा एकर क्षेत्रामध्ये केलेल्या ऊस लागवड केली आहे. गोठणे-दोनिवडे येथे अर्जुना नदीच्या काठावर गेली पाच वर्ष ते एकत्रितरीत्या ऊसाचे पिक घेत आहेत. त्यासाठी योगेश विचारे यांनी गुंतवणूकीसाठी महत्वपूर्ण अशी आर्थिक मदत केल्याचे सांगत त्याबद्दल हनुमंत कृतज्ञतता व्यक्त करतात. ऊस लागवडीद्वारे स्वतःसह इतरांचाही आर्थिक विकास साधत आहे.

Kokan News
Air Travel : विमान प्रवास मंदावला! प्रवासी संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली; तिकीटही स्वस्त

रासायनिकऐवजी शेणखत आणि गोमुत्राचा वापर

शेतातील पिकांवर औषध फवारणी वा खताची मात्रा देण्यासाठी रासायनिक खते वा औषधांचा वापर करण्याऐवजी हनुमंतकडून शेणखत आणि गोमुत्राचा जास्तीत जास्त उपयोग केला जात आहे. त्यातून जमीनीचा पोत आणि कस टिकण्यामध्ये चांगलाच उपयोग होत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांना फाटा देण्याला प्राधान्य तुती आणि ऊस लागवडीमध्येही त्याने कायम ठेवले आहे.

Kokan News
Visa-Free Travel: श्रीलंकेनंतर आता 'या' देशांनी दिली व्हिसाची सूट; यंदा दिवाळीची सुट्टी इथेच प्लॅन करू शकता...

शेतकरी समूह गटाद्वारे रेशीम शेती

हापूस आंबा काजूसह नारळी-पोफळणीच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजापूर-लांजा तालुक्यामध्ये तुती लागवड करून त्याद्वारे रेशीम शेतीची मुहूर्तमेढ रोवण्यात हनुमंत याने अन्य सहकारी शेतकर्‍यांसमवेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाच्या माध्यमातून एकत्रित आलेले राजापूरचे माजी सैनिक वासुदेव घाग, राजाराम पाटेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे आणि लांजा येथील अमर खामकर या प्रगतशील शेतकर्‍यांनी गतवर्षी आपापल्या शेतांमध्ये तुतीची लागवड केली होती. त्या माध्यमातून त्यांनी कोकणामध्ये रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करीत कोकणामध्येही रेशीम शेती करता येत असल्याचे सार्‍यांना दाखवून दिले. या शेतकरी समूूह गटाच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची आदानप्रदान करण्यासह एकमेकांना मार्गदर्शनही केले जात आहे.

Kokan News
Air Travels : सहा महिन्यांत पंधरा लाखांवर प्रवाशांचा विमानप्रवास; प्रवाशांच्या संख्येत ४१ टक्के वाढ

रेशीम शेतीत हनुमंत याचे लक्षवेधी यश

गतवर्षी हनुमंत विचारे यांनी तब्बल 20 अंडी पुंज मागे 480 काऊंट असलेल्या ए ग्रेडची 22 किलो रेशीमची कोष निर्मिती केली होती. हनुमंत यांच्या शेतामध्ये झालेली ही कोषनिर्मिती राज्यातील बहुधा सर्वोत्कृष्ठ कोषनिर्मिती असल्याचे बोलले जात आहे. ए ग्रेडच्या कोषनिर्मितीची गतवर्षीची परंपरा हनुमंत याने यावर्षीही कायम ठेवली आहे. भविष्यामध्ये शेड बांधून रेशीम शेतीचा अधिक विस्तार करण्याचा मानस त्याने ठेवला आहे.

गोठणेदोनिवडेतील हनुमंत विचारेचे पाऊल

पडीक जमिनीत दहा पिके

रेशीम शेतीसह उसाचेही पीक

गेली दहा वर्ष शेती

शेतीमध्ये स्वतःसह इतरांनाही मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.