latest mahrashtra News : निसर्ग आणि मानवी अभिव्यक्तीचा अनोखा संगम असलेले देवीहसोळ गाव अन् येथील सड्यावरील संशोधित झालेल्या कातळशिल्पाच्या माध्यमातून या परिसरामध्ये अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने निसर्गयात्री संस्थचे अन्य संस्थांच्या सहाय्याने दस्तऐवजीकरण आणि मोठ्या प्रमाणात संशोधनाचे काम सुरू आहे.
आर्यादुर्गा मंदीरालगतच्या चौकोनी उठावाच्या रचनेसोबतच विस्तीर्ण सड्यावरील नव्याने प्रकाशात आलेल्या मानवी अस्तित्वाच्या समृद्ध पाऊलखुणांमुळे देवीहसोळच्या परिसराचे जागतिक वारसाच्यादृष्टीने एकप्रकारे महत्व अधोरेखित झाले आहे. त्याला निसर्गयात्री संस्थेचे प्रमुख आणि संशोधक सुधीर रिसबुड यांनी पुष्टी दिली आहे.