Kokan Railway: गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेवर ५० गणपती विशेष गाड्या, जाणून घ्या आरक्षण कधी होईल खुले

Railway Latest Update: पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Kokan Railway 50 ganpati special trains on Western Railway on the occasion of Ganeshotsav reservation opens at 27 july 2024
kokan railwaysakal
Updated on

Mumbai News : गणेशोत्सवानिमित्य कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, या दरम्यान ६ गणपती विशेष गाड्याच्या एकूण ५० फेऱ्या चलकविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Kokan Railway 50 ganpati special trains on Western Railway on the occasion of Ganeshotsav reservation opens at 27 july 2024
Kokan Railway: एका मिनिटांत गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल, गैरप्रकाराचा संशय!

मुंबई सेंट्रल – ठोकुर साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या -

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल - ठोकूर साप्ताहिक गणपती स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवारी दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९००२ ठाकूर - मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल दर बुधवारी रात्री ११ वाजता ठाकूर येथून सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. ही ट्रेन ४ ते १८ सप्टेंबर पर्यंत धावेल.

मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड गणपती विशेष २६ फेऱ्या

ट्रेन क्रमांक क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दररोज (मंगळवार वगळता) रात्री १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २ ते १६ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०१० सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल स्पेशल सावंतवाडी रोडवरून दररोज (बुधवार वगळता) सकाळी ४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मुंबई सेंट्रलला रात्री ८.१० वाजता पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल.

- वांद्रे टर्मिनस - कुडाळ साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या

ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस - कुडाळ साप्ताहिक स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि कुडाळला पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. ही ट्रेन ५ ते १९ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०१६ कुडाळ - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर शुक्रवारी सकाळी ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दोवाशी ६.१५ वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ६ ते २० सप्टेंबर पर्यंत धावेल.

Kokan Railway 50 ganpati special trains on Western Railway on the occasion of Ganeshotsav reservation opens at 27 july 2024
Kokan Railway: एका मिनिटांत गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल, गैरप्रकाराचा संशय!

अहमदाबाद - कुडाळ साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या

ट्रेन क्रमांक ०९४१२ अहमदाबाद - कुडाळ साप्ताहिक विशेष गाडी अहमदाबादहून दर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुडाळला पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९४११ कुडाळ - अहमदाबाद साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर बुधवारी सकाळी ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता अहमदाबादला पोहोचेल. ही ट्रेन ४ ते १८ सप्टेंबरपर्यंत धावेल.

Kokan Railway 50 ganpati special trains on Western Railway on the occasion of Ganeshotsav reservation opens at 27 july 2024
Kokan Railway: कोकणासाठी गणेशोत्सवानिमित्त स्पेशल ट्रेन; जाणून घ्या कधी आणि केव्हा करता येणार बुकिंग !

विश्वमित्री - कुडाळ साप्ताहिक विशेषच्या ६ फेऱ्या

ट्रेन क्रमांक ०९१५० विश्वामित्री - कुडाळ साप्ताहिक विशेष गाडी विश्वामित्री येथून दर सोमवारी सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता कुडाळला पोहोचेल. ही ट्रेन २ ते १६ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्र. ०९१४९ कुडाळ - विश्वामित्री साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर मंगळवारी सकाळी ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल.

Kokan Railway 50 ganpati special trains on Western Railway on the occasion of Ganeshotsav reservation opens at 27 july 2024
Kokan News: कोकणच्या रौद्र सौंदर्याची पर्यटकांना ओढ, मात्र काळजी न घेतल्यास...; वाचा महत्वाची बातमी

आरक्षण -

सहाही गणपती विशेष गाड्याचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर २८ जुलै २०२४ पासून सुरु होणार आहे.

Kokan Railway 50 ganpati special trains on Western Railway on the occasion of Ganeshotsav reservation opens at 27 july 2024
Kokan News: कोकणच्या रौद्र सौंदर्याची पर्यटकांना ओढ, मात्र काळजी न घेतल्यास...; वाचा महत्वाची बातमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.