रत्नागिरी : कोरोनामुळे(kovid 19) कोकण रेल्वे (kokan railway) मार्गावर मोजक्याच गाड्या सुरु होत्या; मात्र कोरोना परिस्थितीतही गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा उत्साह कायम आहे. त्यामुळे नियमित धावणार्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. प्रवाशांची गैरसोय आणि नियमित गाड्यांची गर्दी दूर होण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने चार गणपती उत्सव विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या ५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत धावतील.(kokan-railway-start-september-5-to-22-in-ganesh-festival-kokan-train-marathi-news)
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने गणेशोत्सवासाठीचे नियम व निकष जाहीर केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक आरत्या, कार्यक्रमांवर बंधने घातलेली आहेत. गतवर्षी अनेक चाकरमान्यांना कोरोनामुळे गणेशोत्सवाला गावात येणे शक्य झालेले नव्हते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे अनेक चाकरमान्यांनी गणपतीसाठी मुंबईहून येणार्या गाड्यांचे आरक्षण करण्यास सुरवात केली आहे. त्याचा नियमित गाड्यांवर भार पडणार आहे. कोरोनामुळे गर्दी होऊ नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. त्यात मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी स्पेशल (०१२२७/०१२२८) गाडी ५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत धावेल. या गाडीला २२ डबे आहेत. दुसरी गाडी मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी - मुंबई सीएसएमटी स्पेशल (०१२२९/०१२३०) ही ६ ते २० सप्टेंबर या कालावधीत दर सोमवारी आणि शुक्रवारी धावणार आहे.
पनवेल - सावंतवाडी रोड - पनवेल स्पेशल (०११२११ / ०१२३२२२) ही तिसरी गाडी दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी ७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. रत्नागिरीत येणार्या चाकरमान्यांसाठी विशेष गाडीची सुविधा यावेळी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामध्ये पनवेल - रत्नागिरी - पनवेल स्पेशल (०१२१२३३ / ०१२३४३४) गाडी दर गुरुवारी आणि रविवारी ९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. या सर्व गाड्यांना २२ डबे आहेत. या सर्व गाड्या आरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षित तिकिटे वेबसाईटसह प्रत्यक्ष काऊंटरवर उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.