कोकणच्या तांबड्या मातीत लसणाचा ठसका; कोतापुरातील तरुणाचा यशस्वी प्रयोग

कोकणच्या तांबड्या मातीत लसणाचा ठसका; कोतापुरातील तरुणाचा यशस्वी प्रयोग
Updated on

राजापूर : शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून शेतीकडे (Agriculture) पाहीले जात असताना मात्र, युवा पिढी शेतीपासून काहीशी दूर जात असल्याचे बोलले जाते. याला तालुक्यातील (Taluka) कोतापूर येथील गणेश जानस्कर हा अवघ्या तिशीतील तरूण अपवाद ठरला आहे. गेल्या काही वर्षामध्ये शेतीमध्ये विविध अभिनव प्रयोग करणारे गणेश यांनी यावर्षी घाटमाथ्यावरील शेतांमध्ये दिसणारे आणि कोकणामध्ये (kokan) दुर्मिळ असलेल्या लसणाचे पीक आपल्या वडीलोपार्जित जमिनीमध्ये घेतले आहे. त्यामुळे कोकणवासियांना आता कोकणच्या तांबड्या मातीमध्येही आता लसणाचा ठसका अनुभवता येणार आहे.

कोकणच्या तांबड्या मातीत लसणाचा ठसका; कोतापुरातील तरुणाचा यशस्वी प्रयोग
सातारा : ओमनी, दुचाकी धडकेत तिघे गंभीर; विजयनगरजवळ समोरासमोर धडक

कोतापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविलेल्या गणेशने पुढे वैभववाडी (जि.सिंधुदूर्ग) येथील कृषी महाविद्यालय सांगोलीवाडी येथून बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर ही पदवी संपादन केली. वडील चंद्रकांत जानस्कर शेतामध्ये विविध प्रयोग करून विविधांगी पिके घेत असल्याने घरामध्ये शेतीला पूरक वातावरण होते. वडीलांकडे असलेला अनुभव आणि स्वतः शिक्षण घेतल्याने शेतीविषयक असलेले ज्ञान याच्या जोरावर प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आई-वडीलांच्या सहकार्याने तो सत्यातही उतरविला. पाठ्यपुस्तकीय ज्ञानाच्या आधारावर गणेश यांनी गेल्या काही वर्षामध्ये मका, गहू, काळा तांदूळ

आदींची लागवडीची यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी सुमारे दोन गुंठे जागेमध्ये लसणाची लागवड केली असून तालुक्यातील लसून लागवडीचा हा बहुतांश पहिलाच प्रयोग आहे. गादी वाफे तयार करून त्यामध्ये लसणाचे गावठी जातीच्या बियाण्याची रूजवात केली आहे. सुमारे तीन-साडेतीन महिना कालावधीचे हे पिक असून स्वमालकीच्या विहीरीचे पाटाद्वारे शेतामध्ये पाणी आणून सुमारे सहा इंचापेक्षा जास्त वाढलेल्या रोपांना आठ-दहा दिवसांनी पाणी दिले जाते. लसणाच्या लागवडीसह सफेद तीळ, भाजीपाला, कुळीथ अशी पिकेही त्याने घेतली आहेत.

कोकणच्या तांबड्या मातीत लसणाचा ठसका; कोतापुरातील तरुणाचा यशस्वी प्रयोग
वैभववाडी : करूळ घाटात वाहतुकीचा खोळंबा

लसणाची शेती करण्यासाठी शेतीतज्ञांची फारशी मदत घेतली नसली तरी, वडील चंद्रकांत, आई उज्जवला यांच्याकडे असलेला शेतीचा गाढा अनुभव, भाऊ श्रीकांत, सांगली येथील मित्र प्रफुल्ल साखरे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन उपयोगी आल्याचे गणेश कृतज्ञतापूर्वक सांगतो. त्याचवेळी सोशल मिडीया, युट्युबवर असलेले लसून लागवडीचे व्हिडीओंचाही अभ्यास केल्याचे तो सांगतो. शेतामध्ये पिकणारी लसून स्थानिक बाजारपठेमध्ये विकणार असल्याचे गणेश सांगतो. उन्हाळ्यामध्ये कोकणात मोठ्याप्रमाणात पडीक जमीन असताना गणेशने सातत्याने शेतीमध्ये केलेले अभिनव प्रयोग शेतीसह युवावर्गासाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहेत.

रासायनिक खताला फाटा

जादा उत्पन्न घेण्यासाठी शेतकर्‍यांकडून रासायनिक खताची जादा मात्रा दिली जाते. मात्र, त्याला फाटा देताना गणेशने शेणखताचा उपयोग केला आहे. रोपांना पोटॅश, फॉस्फरस आदी घटकांचती मात्रा मिळावी म्हणून गादी वाफे तयार करताना मातीमध्ये योग्यप्रमाणात ‘राख’ मिसळल्याचे गणेशने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.