रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, (India Meteorological Department) कुलाबा, मुंबई (mumbai) यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या माहितीनुसार 15 जुलै ते 19 जुलै 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात (ratnagiri district) काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस (heavy rain) पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्कता आणि सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 89.07 मिमी तर एकूण 801.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड - 102.10 मिमी, दापोली - 89.20 मिमी, खेड - 70.70, गुहागर - 94.80 मिमी, चिपळूण - 70.40 मिमी, संगमेश्वर - 67.60 मिमी, रत्नागिरी - 86.50 मिमी, राजापूर - 99.60 मिमी,लांजा - 120.70 मिमी.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 15 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने 19 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे. शंकर जानू गोरे यांच्या घराचे 8 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. जनार्दन देवजी धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: 29 हजार 500 रुपये नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात मौजे वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे 3 लाख 55 हजार रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर मौजे ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 27 हजार 600 रुपये नुकसान झाले आहे. मौजे कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे अंशत: 10 हजार रुपये नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.