रत्नागिरी : शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांची समस्या नागरिकांसह वाहनचालकांची डोकेदुखी बनलेली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरुन फिरणारी गुरे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. दिवसभर कळपाने फिरणारी गुरे कधी रस्त्याच्या मधोमध बसून राहतात, तर कधी इकडेतिकडे फिरताना दिसतात. त्यांना चुकवून वाहने हाकण्याचे दिव्य चालकांना करावे लागते. या गोंधळात वाहनांची धडक कधी-कधी पादचाऱ्यांनाही बसत आहे. गुरांची ही समस्या पालिकेकडून कधी निकाली काढणार, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
साळवी स्टॉपपासून किल्ल्यापर्यंत रत्नागिरी शहर वसलेले आहे. आजूबाजूला ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात आहे. शेतीची कामे झाली की हिवाळ्यासह उन्हाळ्यात मोकाट गुरे शहरातील बाजारात खाद्य शोधण्यासाठी येतात, असा पूर्वी अंदाज बांधला जात होता; मात्र तो गेल्या काही महिन्यांमध्ये रत्नागिरी शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांवरून फोल ठरला आहे. पावसाळ्यामध्ये छोट्या वासरांसह गाय, बैलांच्या झुंडी बिनधास्तपणे शहरात फिरताना दिसत आहेत.
साळवी स्टॉपसह मारुती मंदिर परिसरातील ही गुरे रात्रीच्यावेळी एमआयडीसी परिसरात बसलेली आढळतात. बाजारपेठेत फिरणाऱ्या गुरांचा मुक्काम आठवडा बाजार, मिऱ्याकडे जाणारा रस्ता, परटवणे, गाडीतळ परिसरात असतो. सकाळी हीच गुरे शहरात फिरत असतात. सकाळी दहा ते बारा या कालाधीत शहरात वाहनांचे प्रमाण सर्वाधिक असते. याचवेळी ही गुरे रस्त्याच्या मधोमध धावताना दिसतात. अचानक वाहनांच्या समोर आल्यामुळे त्यांना वाचवण्याच्या रत्नागिरीत ठिय्या रस्त्यावरच नादात चालकाचे नियंत्रणही जाते
दोन-चार गुरे रस्त्याच्या मध्येच बसून राहिल्यामुळे त्यांना वाचवून बाजूने गाडी काढण्याची कसरत करावी लागते. गर्दीच्या कालावधीत ही गुरे वाहनचालकांसाठीच नव्हे तर पादचार्यांसाठी धोकादायक बनलेली आहे. यापालिकेकडून गुरे पकडण्याची मोहीम हाती घेतली जाते, पण त्यात सातत्य नसते. काहीवेळा गुरांना शहराच्या बाहेर काढले जाते.
पालिकेचे गुरे हाकलण्याचे पथक गेल्यानंतर तीच मोकाट गुरे पुन्हा शहराच्या दिशेने येतात. या गुरांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. पालिकेतील सत्ताधार्यांची पाच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे प्रशासकांमार्फत कारभार चालवला जातो. त्यामुळे मुख्याधिकार्यांकडून याची गंभीर दखल घेतली जाणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नगरपालिका प्रशासकांकडून मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई करू, असे सांगितले जाते. पण तसे होत नाही. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने वेगळी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित केली तर यावर नक्कीच नियंत्रण ठेवता येऊ शकते असे बहुजन समाज पार्टी अनिकेत पवार यांनी सांगितले.
शहरात मोकटा गुरांचा त्रास गेले अनेक दिवस नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यात मोकाट कुत्रे, घोडे, खेचरांचीही भर पडलेली आहेच. प्रशासन किनारे स्वच्छतेसाठी पुढे सरसावत आहे, पण जीवावर बेतणाऱ्या या समस्येकडे जाणुनबूजून दुर्लक्ष होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा.
- छोटू खामकर, सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.