kokan Ganesh Utsav 2023
kokan Ganesh Utsav 2023Sakal

Ganesh Utsav 2023 : गणा धाव रे मला पाव रे! बाल्या नाच आणि माळी नाचाची परंपरा

बाल्या व माळी नाच कोकणातील ग्रामीण पारंपारिक वैशिष्ट्यपूर्ण नृत्य प्रकार
Published on

पाली : गण्या धाव रे मला पाव रे, अशी गाणी गणेशोत्सवात सादर करतांना कलाकार दिसत आहेत. हा बाल्या व माळी नाच कोकणातील ग्रामीण पारंपारिक वैशिष्ट्यपूर्ण नृत्य प्रकार आहे. पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नाचाची कला जिवंत ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काही कलाकार प्रयत्न करत आहेत.

या नाचतील शक्तीवाले व तुरेवाले पंथ/कला प्रसिद्ध आहे. ही पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला आहे. बाल्या नृत्यालाच 'जाखडी नृत्य' किंवा 'चेऊली नृत्य' असेही म्हंटले जाते.

कोकणात मुख्यतः रायगड जिल्ह्यात गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी व होळी अशा विविध सणांमध्ये गावा खेड्यात पारंपारीक बाल्या डांस आणि हि नाच मंडळी अनेक वर्षापासून आपली पारंपारीक काल सादर करत आहे.

नाचण्याची विशिष्ट व आकर्षक ठेका व लय, कपड्यांचा वेगळेपणा आणि काळजाला भिडणारी पारंपारीक, प्रबोधनात्मक गाणी व संगीत यामुळे अनेक वर्षांपासून बाल्या व माळी डांस खुप लोकप्रिय होता. मात्र आधुनिकतेच्या युगात समाजामध्ये बाल्या नाच आणि माळी नाचाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे. तरुण पिढीने या कडे पाठ फिरवली आहे.

त्यामुळे ही लोककला आता लोप पावत चालली आहे. आपल्या पुर्वजांची हि कला टिकावी, तिचे जतन व्हावे यासाठी दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुण मागील पंधरा वर्षापासून स्वतः हि कला सादर करुन जोपासत आहेत. यातील अनेक तरुण पदवीधर , पदव्युत्तर पदवी, पीएचडी, सेट नेट धारक आहेत. तर कोणी इंजिनियर देखिल आहेत.

मात्र प्रत्येकजण तनमनधनाने कोणताही संकोच न बाळगता हि कला सादर करतात व त्यासाठी मेहनत घेत आहेत. तालुक्यातील इतर गावांमध्ये सुद्धा या तरुणांना ही कला सादर करण्यासाठी बोलावले जाते. ही कला जतन करण्यासाठी गावातील लोकांचा खुप मोठा सहभाग आहे. प्रत्येक कार्यक्रमावेळी दूरशेत गावातील ग्रामस्थ तरुणांसोबत असतात. विशेष म्हणजे आपली पारंपारीक कला आपली मूल आपली नातवंड पुढे नेतात याचा गावातील वृद्धांना खूप आनंद व समाधान वाटते.

आपल्या भावी पिढीला ही कला समजावी व त्यांनी देखील हि पारंपरिक कला अधिक समृद्ध करावी यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून मागील पंधरा वर्षांपासून ही कला जतन करत आहोत. गावातील सर्व ग्रामस्त आम्हाला प्रोत्साहन देवून सहकार्य करतात. पारंपारीक कला टिकावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.

- समाधान म्हात्रे, तरुण कलाकार, दुरशेत, पेण

kokan Ganesh Utsav 2023
Ganesh Visarjan 2023 : 'पहिलवान आला ते लैला ओ लैला....' अजूनही जुन्या गाण्यांवरच तरुणाई धरतेय ठेका, नवी गाणी ठरताहेत अळणी!

शक्ती तुरेवाले बाल्या या नृत्यामध्ये 'शक्तीवाले' आणि 'तुरेवाले' असे दोन पंथ असतात. सहाव्या शतकातील कवी नागेश यांनी 'कलगी' या पंथाला सुरुवात केली. त्यांच्या समकालीन असलेले कवी हरदास यांनी 'तुरेवाले' या पंथाची स्थापना केली.

कलगीवाले हे शक्ती म्हणजे पार्वतीचा मोठेपणा नृत्य आणि गीतांतून वर्णन करतात, तर तुरेवाले हे शिवाचे मोठेपण सांगतात. कलगीवाल्यांमध्ये 'कलगी' या चिन्हाचा, तर तुरेवाल्यांमध्ये डफावर पंच रंगाचा तुरा लावण्याची पद्धत आहे.

या दोन पंथांमध्ये काव्यात्मक जुगलबंदी रंगत असते. या नृत्याचे सामने होतात. त्याला 'बारी' असे बोलले जाते. हे नृत्य सादर करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ढोलकी वादक, गायक आणि कोरस देणारे सर्वजण मध्यभागी बसतात.

kokan Ganesh Utsav 2023
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जन लांबले, मिरवणुकीला आणखी ३ ते ४ तास लागण्याची शक्यता

त्याच्या सभोवताली नृत्य करणारे कलाकार हे गोलाकार उभे राहतात. त्यांनी भरजरी कपडे आणि उजव्या पायात चाळ बांधलेले असतात. 'गणा धाव रे, गणा पाव रे' अशी गणरायाला आळवणी केल्यावर नृत्याला सुरुवात होते.

नृत्य करणारे हे नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करत असतात. ढोलकीवाल्यासोबत एकजण 'चेंगाटी' वाजवायला बसलेला असतो. ढोलकी उभी ठेऊन त्यावर वादकाकडून वाजविण्यात येणाऱ्या प्रकाराला 'चेंगाटी' म्हणतात. या नृत्यातून गण-गवळण, सवाल-जवाब, सामाजिक आणि वास्तवाचे चित्रण करणारी गाणी गायली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.