Konkan Graduate Election : 36 करोडचा आमदार निधी डावखरेंनी कुठे वापरला? अपक्ष उमेदवार निमकरांचा भाजप उमेदवाराला सवाल

पदवीधर मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या 26 जूनला उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे.
Konkan Graduate Election
Konkan Graduate Electionesakal
Updated on
Summary

कोकण पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर हे सोमवारी डोंबिवली येथे प्रचारासाठी आले होते.

डोंबिवली : आमदार निरंजन डावखरे (MLA Niranjan Davkhare) हे गेले दोन टर्म कोकण पदवीधर मतदार संघाचे (Konkan Graduate Election) आमदार आहेत. दरवर्षी 3 करोडचा आमदार निधी मिळतो. या निधीतून काय काम केली त्यांनी. काम कोठेच काही दिसत नाही. 36 करोडचा आमदार निधीचा हिशोब जनतेला त्यांना द्यावा लागेल, असा हल्लाबोल कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर (Nagesh Nimkar) यांनी भाजपचे उमेदवार तथा आमदार निरंजन डावखरे यांच्यावर केला आहे.

पदवीधर मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या 26 जूनला उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंदिस्त होणार असून मतदार कोणाला कौल देतात हे पहावे लागेल. कोकण पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर हे सोमवारी डोंबिवली येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप उमेदवार डावखरे यांच्या कामावरून त्यांच्यावर हल्ला चढवला.

Konkan Graduate Election
Gadchiroli Maoists : देवेंद्र फडणवीसांपुढे आत्मसमर्पण करणारा गिरीधर 'पळपुटा'; पत्रकातून माओवाद्यांची आगपाखड

निमकर म्हणाले, प्रस्तावित उमेदवार म्हणून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देऊ केली आहे. दोन टर्म त्यांना मतदारांनी निवडून दिले आहे. परंतु, त्यांनी त्याचे काही चीज केले नाही. आज एवढा मोठा परिसर त्यांना काम करायला वाव मिळतोय. येथे 52 आमदार आहेत आणि सहा खासदार या मतदारसंघात. त्यांच्या बरोबर त्यांना काम करण्यासाठी भरपूर भाव आहे. परंतु, त्यांनी त्याचे चीज केले नाही. त्यांना दरवर्षी तीन करोडचा आमदार निधी मिळत आहे. 36 करोड रुपये आमदार निधी आतापर्यंत मिळालेला आहे.

कुठेही त्यांचं काम दिसत नाही, की त्यांनी कुठली विधायक काम केले नाहीत. त्याचा हिशोब जनतेला द्यावे लागतात. आज त्यांना जे पदवीधर मतदारांनी विधान परिषदेमध्ये पाठवल आहे. तर, तो पैसा त्यांनी कोणत्या विधायक कामासाठी वापरला? कुठे ही काम दिसत नाही. ना डोंबिवली, ना ठाणे ना कोणत्या कोकणपट्ट्यामध्ये दिसत. त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी काय काम केले याची माहिती दिली. परंतु, आमदार निधीतून काय काम केलं हे दाखवायला पाहिजे, असा सवाल देखील निमकर यांनी यावेळी उपस्थित केला.

Konkan Graduate Election
Pankaja Munde : Instagram वर पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह कमेंट; ओबीसी समाज आक्रमक, जिंतूरमध्ये तणावाचं वातावरण

मागील काळात पदवीधर मतदार संघ निवडणुकीत जे उमेदवार निवडून आले होते, त्यांची कामे पाहता त्यांनी पाच जिल्ह्यांचा विकास सोडा, ठाणे शहराचा विकासही केलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काहींना कर्तव्ये, अधिकार यांची देखील माहिती नाही. असे उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. मी अवघा कोकण भाग पालथा घातला असून तेथील समस्या आणि गरजा यांचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. त्यासाठी या पूर्वीच मी पाठपुरावा सुरू केला असून भविष्यात अनेक कामे दृष्टिपथात आहे. मला मतदारांनी संधी दिली तर पदवीधर आणि जनतेचा आवाज विधान परिषदेत बुलंद होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.