'नैसर्गिक आपत्तीकाळात सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहणार'; अर्जुना धरणक्षेत्रासह अणुस्कुरा घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Inspection of Anuskura Ghat along with Arjuna Dam area by District Collector: नैसर्गिक आपत्तीकाळात सर्व प्रशासकीय विभागांनी दक्ष राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या.
Anuskura Ghat
Anuskura Ghatesakal
Updated on
Summary

बैठकीनंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अणुस्कुरा घाटामध्ये रस्त्यावर दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी केली व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या.

राजापूर : नैसर्गिक आपत्तीकाळात (Natural Disaster) सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रशासनाला दिल्या. राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अणुस्कुरा घाट (Anuskura Ghat) दरड प्रवणक्षेत्र व अर्जुना धरण प्रकल्पाची (Arjuna Dam Project) पाहणी केली.

राजापूर (Rajapur) प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, तहसीलदार शीतल जाधव, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, मुख्याधिकारी प्रशांत भोसले आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Anuskura Ghat
Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आरोग्य, बांधकाम, कृषी, महसूल प्रशासकीय विभागांनी नैसर्गिक आपत्ती काळासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. राजापूर तालुक्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसाठीच्या नियोजनाबाबतची माहिती प्रांताधिकारी वैशाली माने यांनी दिली. राजापूर शहरातही कशाप्रकारे आपत्तीकाळात नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Anuskura Ghat
Mahabaleshwar Rain : दुष्काळाशी झुंज देणाऱ्या 'या' तालुक्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस; पंधरवड्यात 332 टक्के पर्जन्यमान

या वेळी तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्र व तेथील परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीकाळात सर्व प्रशासकीय विभागांनी दक्ष राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अणुस्कुरा घाटामध्ये रस्त्यावर दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी केली व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच अन्य धोकादायक ठिकाणांचीही पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.