Monsoon Tourism : स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार अनुभवायचाय? मग, खेड-साताऱ्याला जोडणाऱ्या 'या' घाटाला जरुर भेट द्या

रघुवीर घाट (Raghuveer Ghat) हा रत्नागिरी आणि सातारा दोन जिल्हे जोडतो.
Konkan Monsoon Tourism Raghuveer Ghat
Konkan Monsoon Tourism Raghuveer Ghatesakal
Updated on
Summary

पावसाळ्यात सुरुवातीपासून तुम्हाला कोकणी खेडेगावातून दोन्ही बाजूला हिरवी भाताची रोपे आणि मध्ये काळाकुळकुळीत डांबरीरोड असा प्रवास सुरू होतो.

-पराग वडके, रत्नागिरी

parag.vadake@gmail.com

लाल खेकडे, ढगांचे एकमेकांवर आपटणे, ढगांचे फुटणे, पाऊस कसा कोसळतो, क्षणात ढग आणि क्षणात स्वच्छ भव्य निसर्गाचा चमत्कार, असंख्य औषधी वनस्पती, हवे तसे सुरक्षित धबधबे हे सर्व पावसाच्या स्वागतासाठी पाहायचे असेल तर थेट गाठायचा तो खेड-सातारा (Khed-Satara) यांना जोडणारा रघुवीर घाट पाहायला.

Konkan Monsoon Tourism Raghuveer Ghat
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आंबोली घाटातला 'हा' मुख्य धबधबा झाला प्रवाहित; महाराष्ट्र, कर्नाटकसह गोव्यातील पर्यटक दाखल होणार

रघुवीर घाट (Raghuveer Ghat) हा रत्नागिरी आणि सातारा दोन जिल्हे जोडतो. एकूण १२ किलोमीटरचा घाट आहे. समुद्रसपाटीपासून उंची ७६० मीटर म्हणजे जवळजवळ १४४० फूट उंच. चिपळूणकडूनसुद्धा चोरवणे, खोपी, शिरगाव ही गावे करत तेथे जाता येते. मुळात हा मार्ग वनखात्याच्या अंतर्गत येतो. व्याघ्र प्रकल्पसुद्धा (Tiger Project) याच मार्गावर येतो. सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा एखादा आणखी मार्ग असावा असा प्रस्ताव १९९० ला मांडला गेला; पण वनखात्याच्या आणि निसर्गसंपदेच्या रक्षणासाठी रडतखडत परवानग्या मिळत हा घाट पूर्ण झाला; पण आजही एकेरी मार्ग आहे.

हा १२ किलोमीटरचा प्रवास एक सुखद अनुभव आहे. विशेषतः पावसळ्यात सुरुवातीपासून तुम्हाला कोकणी खेडेगावातून दोन्ही बाजूला हिरवी भाताची रोपे आणि मध्ये काळाकुळकुळीत डांबरीरोड असा प्रवास सुरू होतो. वाटेत आत्ताच्या काळात लाल माती आणि नांगरणी तर कुठे लावणी तर कुठे चढणीचे मासे पकडणारे स्थानिक आणि फुल टू फोटोग्राफीची धमाल करत आपण जात असतो.

Konkan Monsoon Tourism Raghuveer Ghat
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर ही बातमी महत्त्वाची! 'या' घाटातील संरक्षण भिंत कोसळली

जर तुम्ही खेडमार्गे येणार असाल तर वाटेत खेड ते रघुवीर घाट या मार्गावर वेरूळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, बिजघर इत्यादी गावे लागतात. प्रत्येक गाव स्थानिक विविध वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. बिजघर येथे ३७५ वर्षापूर्वीचे प्राचीन शिवपार्वती काळकाई मनाई मंदिर आणि परिसर पाहण्यासारखा आहे. अशी ठिकाणे करत करत आपण घाटरांगेत वर वर जाऊ लागतो. त्या वेळी निसर्गाचा एक नैसर्गिक चमत्कार दिसतो. भारतात फक्त काही ठिकाणी दिसणारे विशिष्ट जातीचे लाल खेकडे काळ्याभोर दगडावर दिसू लागतात. ते नेमके या सीझनला कसे काय येतात कळत नाही आणि तुम्ही अगदी घाटमाथ्यावर पोहचता.

Konkan Monsoon Tourism Raghuveer Ghat
Ganpatipule Temple : कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणार प्रचंड गर्दी; 'हे' आहे खास कारण

तिथे गेल्यावर सरकारने मनात आणले तर एखादे पर्यटनस्थळ कसे विकसित होऊ शकते त्याचे उदाहरण पाहायला मिळते. डोंगररांगामध्ये एक लांबलचक डोंगराची माची आहे. त्याच्या थेट आतपर्यंत शासनाने मस्त रेलींगमध्ये बसायला पेव्हरब्लॉकचा फूटपाथ बांधला आहे. त्यामुळे आपल्याला थेट दरीत जाण्याचा अनुभव घेता येतो. हाच रस्ता पुढे शिंदी गावात आणि थेट तापोळा, महाबळेश्वर वगैरेला जातो. तुमच्याकडे अजून थोडा वेळ असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. शिंदी गावातील खिंडसुद्धा अशीच पाहण्यासारखी आहे. असंख्य फोटोस्पॉट आहेत. कोकण पावसात स्वर्ग बनतो असे म्हणतात तर रघुवीर घाट त्या स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार आहे. त्यामुळे फिरस्ती करणाऱ्यांनी जरूर भेट द्यावा, असाच हा घाट आहे.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.