Konkan Rain : महापुराचा धोका! इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर रत्नागिरीतील 571 कुटुंबांमधील 1700 लोकांचं स्थलांतर

मॉन्सूनचे (Monsoon) उशिराने आगमन झाले तरीही जुलै महिन्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे.
Konkan Monsoon Update
Konkan Monsoon Updateesakal
Updated on
Summary

इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दरडग्रस्त गावांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

रत्नागिरी : मॉन्सूनचे (Monsoon) उशिराने आगमन झाले तरीही जुलै महिन्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. दीड महिन्यात घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्तांचे १ कोटी ३५ लाखांचे नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर सतर्कता म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील १५० दरडप्रवण गावांतील ५७१ कुटुंबांमधील १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले.

Konkan Monsoon Update
Kolhapur Flood Update: कोल्हापुरात पूरस्थिती! पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज खुले होणार?

मागील पंधरा दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. वेगवान वाऱ्‍यामुळे झाडे पडून घरा-गोठ्यांचे नुकसान वाढले आहे. पुरामुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापुरात नुकसानीची नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भुस्खलनाचाच आहे. इर्शाळवाडतील घटनेमुळे जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांवरील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्याची कडक अंमलबजावणी केली गेली. जिल्ह्यातील १५० दरडप्रवण गावांतील ५७१ कुटुंबांमधील १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पुरामुळे धोका होऊ शकतो, अशा २४ गावांतील १३० कुटुंबांतील ४७७ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एकूण ७०१ कुटुंबांतील २०७८ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. स्थलांतर करताना अनेकांनी आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Konkan Monsoon Update
Koyna Dam Update: महापुराची धास्ती! महाराष्ट्राचं 'आलमट्टी'वर तर कर्नाटक शासनाचं 'कोयने'वर लक्ष्य; दोन्ही धरणांत किती आहे साठा?

ज्यांचे स्थलांतर समाजमंदिर, शाळेत करण्यात आले आहे, अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे दोन लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पुरवठा विभागाकडून त्यांना धान्य देण्याची व्यवस्था करावी, तसेच आवश्यक तेथे शिवभोजन थाळीचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. अति पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे नुकसान कमी झाले आहे.

जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि राजापूर या पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये ११२ शेतकऱ्‍यांचे १७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. पावसामुळे जिल्ह्यात १९२ घरांचे अंशत: ६८ लाख रुपये, ३४ अंशत: व दोन पूर्णतः गोठ्यांचे १७ लाख ६७ हजार रुपये आणि ३० सार्वजनिक मालमत्तांचे ५० लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा पावसामध्ये आतापर्यंत एक बळी गेला आहे.

Konkan Monsoon Update
Radhanagari Dam : संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलेल्या राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रशासनाची शून्य जीवितहानी मोहीम

इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दरडग्रस्त गावांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. मागील आठवड्यात चिपळूण, खेड येथील पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पाहणी केली होती. शुन्य जीवितहानी मोहीम प्रशासनाने हाती घेतली असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.