गुहागर : पक्ष बांधणी करणारे पहिल्या रांगेतून गायब

राष्ट्रवादीत नेमके स्थान कोणाला?; दोन वर्षांनंतर सहदेव बेटकरांचे दर्शन
पक्ष बांधणी करणारे पहिल्या रांगेतून गायब
पक्ष बांधणी करणारे पहिल्या रांगेतून गायब sakal
Updated on

गुहागर : राष्ट्रवादीच्या परिवार संवादयात्रेमध्ये गुहागरकरांना तब्बल अडीच वर्षांनी सहदेव बेटकरांचे दर्शन झाले. दापोलीतील पक्षप्रवेशकर्तेही पहिल्या रांगेत होते. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी करणारे गुहागरचे तालुकाध्यक्ष, गुहागरचे नगराध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते पहिल्या रांगेत कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके स्थान कोणाला, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

परिवार संवादयात्रेच्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत गुहागरातील कोणालाच स्थान नव्हते. याला अपवाद होता, तो विधानसभा निवडणुकीतील उमेदवार सहदेव बेटकर यांचा. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये कुठेही न दिसणाऱ्या सहदेव बेटकर यांचे गुहागरातील कार्यकर्त्यांना प्रथमच दर्शन झाले. गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात गुहागरमधील प्रत्येक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची सभा झाली. प्रत्येक पंचायत समिती गणामधील कार्यकर्त्यांच्या बैठका तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतल्या. दरम्यानच्या काळात गुहागरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या वेळी संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये कुठेही न दिसलेले सहदेव बेटकर प्रथमच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले. त्यांनी राष्ट्रवादीचा मफलर घेतला असल्याने सर्वांमध्ये ते उठून दिसत होते.

पक्ष बांधणी करणारे पहिल्या रांगेतून गायब
गुंठेवारीच्या नावाखाली हिंदूंचा छळ

खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, पक्ष निरीक्षक बबन कनावजे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम यांच्याबरोबर पहिल्या रांगेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेले संदीप राजपुरे आणि शंकर कांगणे यांना जागा देण्यात आली होती.

बेंडल, आरेकर नव्हते पहिल्या रांगेत

दरम्यान, मुंबईत पक्षप्रवेश करणारे गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीचे निःस्वार्थपणे काम करणारे पद्माकर आरेकर यांना पहिल्या रांगेत स्थान नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीत पडझड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी झटणारे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनाही पहिल्या रांगेत स्थान मिळाले नाही. नव्यांना मानाचे पान देताना जुन्यांना मागल्या ओळीत बसवण्यात आले. याची चर्चा सध्या गुहागरमध्ये सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या कौटुंबिक कार्यक्रमात प्रदेश स्तरावरील मंडळी मार्गदर्शनासाठी आली होती. येथे मानपानाचा प्रश्र्नच येत नाही. मला स्वत:ला कुठे बसतो, यापेक्षा काय काम करतो, यामध्ये स्वारस्य आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या तालुक्यात आलेल्या नेतेमंडळींचा सन्मान झाला, यात मी समाधानी आहे. पत्रकारांच्या संदर्भात जे घडले, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली.

- राजेंद्र आरेकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.