कोकणात 'अणुऊर्जा, रिफायनरी'ला विरोध असताना माशेलकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, सरकारनं माझ्यावर जबाबदारी टाकली तर..

अणुऊर्जा प्रकल्प काळाची गरज आहे. अणुऊर्जेशिवाय आता पर्याय नाही.
Scientist Dr. Raghunath Mashelkar
Scientist Dr. Raghunath Mashelkaresakal
Updated on
Summary

'अणुऊर्जा आणि रिफायनरी (Refinery Project) असे प्रकल्प कोकणात होणे आवश्यक आहे. यातून रोजगार मिळू शकणार आहेत.'

सावंतवाडी : कोकण मनाने श्रीमंत आहे; परंतु धनाने श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा, रिफायनरी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांची आवश्यकता आहे. असे प्रकल्प येथे आल्यास रोजगार उपलब्ध होऊन कोकणची प्रगती होऊ शकते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Senior scientist Dr. Raghunath Mashelkar) यांनी येथे व्यक्त केले.

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे डॉ. माशेलकर यांच्यासोबत ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘अणुऊर्जा आणि रिफायनरी (Refinery Project) असे प्रकल्प कोकणात होणे आवश्यक आहे. यातून रोजगार मिळू शकणार आहेत. असे मोठे प्रकल्प आल्याशिवाय रोजगाराची किंबहुना कोकणची प्रगती होऊ शकणार नाही.

Scientist Dr. Raghunath Mashelkar
अभिमानास्पद! कोल्हापुरातील प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण'ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

अणुऊर्जा प्रकल्प काळाची गरज आहे. अणुऊर्जेशिवाय आता पर्याय नाही. पवनचक्की, सौरऊर्जेसारख्या प्रकल्पांबाबत देशासमोर मर्यादा आहेत. हे प्रकल्प आणि अणुऊर्जा विजेमध्ये प्रचंड तफावत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही याबाबत विवेचन केले आहे. त्यामुळे अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही."

ते पुढे म्हणाले, ‘‘अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक असल्याचे चित्र रंगवले जाते; मात्र देशात आतापर्यंत एकाही अणुऊर्जा प्रकल्पामध्ये दुर्घटना घडली नाही. आता सुरक्षित असे रिऍक्टर आले आहेत. अशा प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे कोणताही धोका नाही. हीच बाब रिफायनरी प्रकल्पाबाबतही आहे. प्रदूषण कमी करणारे रिफायनरी तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे.

Scientist Dr. Raghunath Mashelkar
देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लवकरच 'रामराज्य' येईल; जितेंद्र सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य

गुजरात-जामनगर येथे रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी दर्जेदार आंब्याचे उत्पन्न घेतले जात आहे. ते परदेशातही निर्यात केले जातात. त्यामुळे प्रकल्पांना विरोध होणे चुकीचे आहे. या संदर्भात शासनाने जनतेशी संवाद साधला पाहिजे. संवादातूनच जनतेतील गैरसमज दूर होतील. त्यासाठी आमच्यासारख्या शास्त्रज्ञांची मदत घेतली पाहिजे. सरकारने माझ्यावर अशी जबाबदारी टाकल्यास कोकणचा सुपुत्र म्हणून मी निश्चितच ती पार पाडेन.’’ यावेळी डॉ. प्रवीणकुमार ठाकरे उपस्थित होते.

येथील जनतेशी संवाद साधून प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करून कोकण श्रीमंत होण्यासाठी जे प्रयत्न करता येतील, ते मी करेन.

-डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()