Bhandarli Dumping Ground
Bhandarli Dumping Groundsakal

Konkan News: डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

Published on

Konkan News: गुहागर तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने शहरात जमा होणारा दैनंदिन घनकचरा शृंगारतळी बाजारपेठेतील लोकवस्तीत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकत आहे. या दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यामुळे लगत असलेल्या रहिवासी व विद्यार्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Bhandarli Dumping Ground
Konkan News: आयुष्याला कंटाळून कब्बडी पटूने केली उचलले टोकोचे पाऊल !

याबाबत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने या ग्राउंडबाबत गटविकास अधिकाऱ्यांना या विषयाच्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्यास सांगितले होते; मात्र याबाबत अजूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. हा कचरा इथून उचलण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


शहरात जमा होणारा दैनंदिन घनकचरा शृंगारतळी परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर सुमारे दोन गुंठे जागेवर हे ग्राऊंड सुरू केले आहे. ग्रामस्थ व न्यू इंग्लिश स्कूल यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन दिले आहे.

पाटपन्हाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील जमा होणारा कचरा आमच्या घरापासून व शाळेच्या ठराविक अंतरावर टाकला जात आहे. या कचऱ्यापासून रहिवासी व लहान विद्यार्थ्यांना डास, धूर व दुर्गंधी यापासून त्रास होत आहे. कचऱ्यामुळे भयंकर रोगराई पसरू शकते. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या तक्रारीवर तहसील कार्यालयाने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत आपण अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या आहेत.

परंतु, तहसीलदारांच्या पत्राला एक महिना उलटून गेला तरी गटविकास अधिकारी वा ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या बेजबाबदार प्रकारामुळे येथील रहिवासी व लहान विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे.

Bhandarli Dumping Ground
Konkan Politics : सर्वस्व पणाला लावून भाजपसाठी काम करा; माजी खासदार नीलेश राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.