Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal

Uddhav Thackeray : 'नेत्यांनो.. गाफील राहू नका, लोकसभेच्या तयारीला लागा'; ठाकरेंकडून फिल्डिंग लावण्यास सुरवात

लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत.
Published on
Summary

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे दौरे कोकणात होणार आहेत.

चिपळूण : लोकसभेच्या (Loksabha Election) जागा वाटप झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर कोकणातील नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा करण्यात आली. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. गाफील राहू नका, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Uddhav Thackeray
Loksabha Election : भाजप निंबाळकरांचं तिकीट कापणार? मोहिते-पाटलांच्या 'या' घोषणेमुळं राजकीय चर्चांना उधाण

लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडची जागा उद्धव ठाकरे गट लढवणार आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत. त्यामुळे ठाकरेंनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.

ठाकरे यांनी नुकतेच मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीला खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर, सुभाष देसाई, भास्कर जाधव, अनंत गीते आदी उपस्थित होते. पक्षप्रमुख ठाकरे यांनी बैठकीला आलेल्या नेत्यांशी संवाद साधला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही मार्गदर्शन केले.

Uddhav Thackeray
Loksabha Election : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित! लोकसभेच्या 'या' दोन्ही जागा ठाकरेंकडे, ही नावं चर्चेत

या वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेशच दिले. लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीचे नियोजन करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Uddhav Thackeray
Deepak Kesarkar : 'तुम्हाला अजून किती संधी द्यायची? भाई.. आता पुरे, थांबा आता'; केसकरांविरोधात झळकले बॅनर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे दौरे कोकणात होणार आहेत. दिवाळीनंतर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कोकणात दौरे होणार आहेत. निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सभांचेसुद्धा नियोजन केले जाणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीला शिंदे गटाचे तर रायगड लोकसभा मतदार संघात भाजपसह मुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.