Sindhudurg : शिंदे-फडणवीसांमुळं जनतेचं राज्य आलं असं वाटू लागलंय; राणेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

हक्काने हाक मारा, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यंत्री फडणवीस तुमच्या हाकेला ओ देवून मदतीला धावतील.
Narayan Rane Uddhav Thackeray
Narayan Rane Uddhav Thackeraysakal
Updated on
Summary

मागील अडीज वर्षात जे माजी मुख्यमंत्री होते, ते कधी जनतेला भेटत नव्हते.

कुडाळ : तेव्हा शिवसनेत असताना आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी आणि कोकणच्या विकासाची काम केली. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब गेल्यानंतर ठाकरे सेनेने मराठी माणसाला देशोधडीला लावले; मात्र आता शिवसेना आणि भाजप (BJP) युतीचे शिंदे-फडणवीस सरकार आले आहे.

तुमचे अधिकार देण्यासाठी, तुम्हाला योजनांचा लाभ देण्यासाठी ते तुमच्या दारी आले आहेत. हक्काने हाक मारा, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यंत्री फडणवीस तुमच्या हाकेला ओ देवून मदतीला धावतील. प्रत्येकाला न्याय देतील, असा विश्वास केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी येथे व्यक्त केला.

Narayan Rane Uddhav Thackeray
Akshay Bhalerao Case : आरोपीला काँग्रेसच्या आमदारानं लपवून ठेवलं; कवाडेंचा चव्हाणांवर गंभीर आरोप

ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शासन आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य आहे. आज जनजीवन, पायभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, रोजगार, नोकरी अशा कोणत्या अपेक्षा आहेत हे विचारण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस यांच्यामुळे जनतेचे राज्य आले असे वाटू लागले. कारण ते जनतेमध्ये सामील होतात.

मागील अडीज वर्षात जे माजी मुख्यमंत्री होते, ते कधी जनतेला भेटत नव्हते. मंत्रालयात कधी आले नाहीत किंवा मातोश्रीवर भेटायला गेले तर भेट देली नाही आणि आमचे मुख्यमंत्री जनतेला भेटून काय हवे आहे? काय योजना द्याव्यात?, दिलेल्या योजना पोचत आहे काय? हे पाहत आहे. किती फरक आहे ते पहा. म्हणून म्हणतो हे जनतेचे सरकार आहे.

Narayan Rane Uddhav Thackeray
Dharashiv : 'तू तुझ्या औकातीत राहा भंगारचोर'; ठाकरे गटाच्या खासदारानं भाजप आमदाराला चांगलंच सुनावलं

काल मंत्रलायात माझ्या खात्याची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी १३ कोटी माफ करून जमीन दिली. त्यामुळे उद्योगाचे प्रशिक्षण आता लवकरच सिंधुदुर्गात सुरू केले जाणार आहे. त्यासाठी राज्याला केंद्र सरकार आणि माझे उद्योग मंत्रालय मदत करेल आणि येथील युवकांना येथेच उद्योग शिक्षण मिळेल अशी व्यवस्था केली आहे.

Narayan Rane Uddhav Thackeray
Kolhapur : छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; राजकीय नेत्यांनी कोल्हापुरातील जनतेला केलं 'हे' आवाहन

समुद्र किनारा फिरण्यासाठी मिनी ट्रेन सुरु करण्याचा माझा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांना दिला आहे. पंतप्रधान मोदी त्यासाठी लवकरच मंजुरी देतील असा विश्वास आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीचे कारखाने आणण्याचा प्रयत्न आहे. मोठे प्रकल्प आले तर त्याचे स्वागत करा. विरोध करणारे कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करत आहे. त्यांच्या नादी लागू नका.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.