Konkan Politics : मला उमेदवारी दिली नाहीतरी अजितदादा जो उमेदवार देतील, त्याला..; आमदार निकमांचा स्पष्ट इरादा

'आपल्याऐवजी पक्षाने दुसरा उमेदवार दिला तरी त्याचे काम जोमाने करण्याची तयारी राहील.'
Konkan Politics MLA Shekhar Nikam
Konkan Politics MLA Shekhar Nikam esakal
Updated on
Summary

'आजच्या घडीला वेगवेगळ्या स्तरावर महायुतीचे काम सुरू असले तरी भविष्यात एकत्रितपणे महायुती भक्कमपणे काम करताना दिसेल.'

चिपळूण : आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही. चिपळूणमधील उमेदवारी आपल्याला मिळेल की नाही, ते माहिती नाही; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जो उमेदवार देतील, त्या उमेदवारासमोर कोणताही उमेदवार असला तरी आम्ही त्याला भिडणार, अशा शब्दांत आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांनी आपले इरादे स्पष्ट केले.

Konkan Politics MLA Shekhar Nikam
'त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली, तर साडेतीन लाखाच्या मताधिक्क्यानं विजयी करू'; मंत्री सामंतांचं कोणाबद्दल विधान?

त्याचवेळी त्यांनी महायुतीत समन्वय ठेवण्यासाठी समितीची स्थापना होणार असल्याचेही संकेतही दिले. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव गुहागरऐवजी चिपळूण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यातच जाधव यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यात चिपळूणसह पाचही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवू, असे स्पष्ट केले होते.

Konkan Politics MLA Shekhar Nikam
कर्नाटकात Operation Lotus फेल? भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं घेतली मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट, लवकरच होणार 'घरवापसी'

याविषयी आमदार निकम यांना सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत छेडण्यात आले असता ते म्हणाले, ‘‘मुळातच आमदार जाधव राज्याचे नेते असल्याने त्यांच्या वक्तव्यांवर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात उमेदवार निवडीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील. त्यांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत.

Konkan Politics MLA Shekhar Nikam
Kolhapur NCP Sabha : शरद पवारांनंतर कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर धडाडणार अजितदादांची तोफ; कधी सभा, कोणावर साधणार निशाणा?

उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असे नाही. आपल्याऐवजी पक्षाने दुसरा उमेदवार दिला तरी त्याचे काम जोमाने करण्याची तयारी राहील. समोर कोणीही उमेदवार असला तरी त्याला भिडण्याची आमची ताकद आहे.’’

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी नगरसेविका फैरोजा मोडक, आदिती देशपांडे, शिवानी पवार, उदय ओतारी, सचिन साडविलकर, विशाल जानवलकर आदी उपस्थित होते.

Konkan Politics MLA Shekhar Nikam
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

विकासकामांना गती शक्य

आमदार निकम म्हणाले, ‘‘सत्तेत सहभागी असलेले महायुतीमधील पक्ष आपापल्या स्तरावर काम करत आहेत; परंतु भविष्यात या पक्षांमध्ये समन्वयक राहण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. त्यात महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

त्यामुळे आजच्या घडीला वेगवेगळ्या स्तरावर महायुतीचे काम सुरू असले तरी भविष्यात एकत्रितपणे महायुती भक्कमपणे काम करताना दिसेल. आज विविध विकासकामांसाठी महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती मिळालेली दिसेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.