Konkan Railway News: कोकण रेल्वेची प्रवासी मालवातुकीसह सर्वच क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी!

Konkan-Railways
Konkan-Railwayssakal
Updated on

Railway News : कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेने आपला ३३ वा स्थापना दिवस सोमवारी मोठया उत्साहात साजरा केला. यावेळी कोकण रेल्वेच्या गत ३३ वर्षाच्या कामगिरीची माहिती देताना कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने प्रवासी मालवातुकीसह सर्वच क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केल्याचे सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल), आर.के. हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते.

Konkan-Railways
Maharastra Politics : अजितदादांमुळे अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलेल

यावेळी संजय गुप्ता यांनी माहिती देताना कोकण रेल्वेने आपल्या मार्गाचे १०० विद्युतीकरण पुर्ण केल्याचे सांगितले. शिवाय आतापर्यंतचा सर्वाधिक ९६३.४३ कोटी रुपयांचा प्रवासी महसूल मिळवल्याचे तसेच ७६७.४७ कोटी रुपयांचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल प्राप्त केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ३२७४.७० कोटींचा सर्वाधिक प्रकल्प महसूल मिळण्याबरोबरच ५१५२.२३ कोटी रुपयांचा एकूण महसूल कमावला आहे.

कोकण रेल्वेला आतापर्यंतचा सर्वोच्च २७८.९३ कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचे सांगतानाच कोकण रेल्वेने यावर्षी लोडिंगमध्ये देखील आतापर्यंतची सर्वाधिक मजल मारल्याचे तसेच या कामगीरीत कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांचा मोलाचा वाटा असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडित परिचलन सेवापुर्तीनिमित्त महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱयांचा कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी कोकण रेल्वेचे उप महाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीक, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरुप बागूल यांच्यासह विविध विभागात उल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कोकण रेल्वे जनसंपर्क विभागालादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Konkan-Railways
Maharashtra Cricket: कोल्हापुरचे सुपुत्र महाराष्ट्र क्रिकेट संघात, सुरत येथे होणार स्पर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.