Railway: महत्वाची बातमी, कोकण रेल्वेच्या 'या' गाड्या दादरपर्यंत धावणार

Konkan Railway : मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
 रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावरील फलाटाच्या विस्तारीकरणामुळे हा बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
Railway: महत्वाची बातमी, कोकण रेल्वेच्या या गाड्या दादरपर्यंत धावणार | Latest Marathi NEws | sakal
Published on

Kankavli News: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या मुंबईतील दादर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरण कामामुळे दादर स्थानकावर या गाड्या ७ जुलैपर्यंत थांबतील. गाडी क्र. १२१३४ मंगळूर जं. ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

गाडी क्र.२२१२० मडगाव ते मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबेल. गाडी क्र.१२०५२ मडगाव ते मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबेल. रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावरील फलाटाच्या विस्तारीकरणामुळे हा बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.