Mumbai-Goa Highway: आता मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून करा बिनधास्त प्रवास; प्रशासनानं 'या' सुविधा केल्या उपलब्ध

महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरण केल्यानंतर दरडीचा धोका वाढला आहे.
Parshuram Ghat on Mumbai-Goa Highway
Parshuram Ghat on Mumbai-Goa Highwayesakal
Updated on
Summary

पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत परशुराम घाटात चारवेळा दरड कोसळली आहे.

Chiplun News : कोकणात पावसाचं (Rain in Konkan) थैमान सुरूच आहे. अशात मुंबई - गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) महत्वाच्या परशुराम घाटात (Parashuram Ghat) दरडीचा धोका कायम असल्याने येथे वीज व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय, जेसीबी व अन्य यंत्रणादेखील सज्ज ठेवली आहे.

महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरण केल्यानंतर दरडीचा धोका वाढला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत चारवेळा दरड कोसळली आहे. बुधवारी येथे पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्या आधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली.

Parshuram Ghat on Mumbai-Goa Highway
Tourism News : पर्यटनासाठी जाताय? मग, 'ही' काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा जीव गमावून बसाल!

त्या पाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परशुराम घाटातील वाहतूक दरड बाजूला करेपर्यंत थांबवण्यात आली होती. त्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी चिरणीमार्गाने वाहतूक वळवली होती; मात्र त्यानंतर तातडीने रस्त्यावर आलेले दगड व माती हटवून आधी एकेरी व त्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

Parshuram Ghat on Mumbai-Goa Highway
Kolhapur Rain : 'पंचगंगा' इशारा पातळी गाठणार! राधानगरीत 5.95 TMC तर 'या' 14 धरणांत किती आहे साठा? जाणून घ्या..

अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परशुराम घाटातील दरडीचा धोका टळलेला नाही. त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घाटातील मध्यवर्ती ठिकाणी दरडीचा मोठा धोका असल्याने तेथे वीज उपलब्ध केली आहे.

Parshuram Ghat on Mumbai-Goa Highway
निवडणुका जवळ आल्या, की मतदारसंघात दिसणारे केसरकर आहेत कुठे? पूरस्थितीवरुन ठाकरे गटाचा सवाल

जेणेकरून रात्री -अपरात्री रस्त्यावर आलेली माती किंवा दगड वाहतूकदारांना सहजपणे दिसावे, असे नियोजन केले आहे. त्याशिवाय दरड हटवण्यासाठी जेसीबी व पोकलेनची व्यवस्था तैनात केली असून, घाटातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.