काळजी घ्या! पुढील 4 ते 5 तासांत कोकणात मुसळधार पाऊस - IMD

हवामान खात्याकडून मागील दोन दिवासांपासून कोकणातील काही भागाला अलर्ट देण्यात आला होता
Weather Updates | Rain News Updates
Weather Updates | Rain News Updatessakal
Updated on
Summary

हवामान खात्याकडून मागील दोन दिवासांपासून कोकणातील काही भागाला अलर्ट देण्यात आला होता

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने राज्यातील काही भागांत पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान, आता पुढील चार ते पाच तासांत कोकणातील काही भागांत पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (weather update possibility rain in konkan district)

मुंबई, ठाणे, रायगड, नवी-मुंबई, पालघर या भागात ढग आले असून पुढील ४ ते ५ तास उत्तर कोकणातील काही भागात पावासाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोन दिवसांत कोकणातील काही भागाला अलर्ट देण्यात आला होता. तसेच विदर्भाला येलो अलर्ट आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होणार नसल्याची माहिती दिली होती.

Weather Updates | Rain News Updates
देवेंद्र फडणवीस आता CM शिंदेंचे राईट हॅंड, राऊतांचा टोमणा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून हवामान खात्याकडून (Weather Department IMD) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाला असून कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

दरम्यान, मुंबईत मुसळधार पावसामुळं अनेक भागात पाणी साचलं आहे. तर, अनेक ठिकाणी लोक गुडघाभर पाण्यातून जाताना दिसत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरात 119.09 मिमी, पश्चिम उपनगरात 78.69 मिमी आणि पूर्व उपनगरात 58.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता पुन्हा हवामान खात्याकडून पुढील चार ते पाच तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

Weather Updates | Rain News Updates
Agriculture Day : भूमिहिनांना एक लाख एकर जमीन वाटणाऱ्या मुख्यमंत्र्यांने महाराष्ट्रात हरितक्रांती घडवली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.