Konkan Rice Farming: जिल्ह्यात यंदा ६३ हजार हेक्टरवर भात लागवड, दमदार पावसामुळे रोप पुनर्लागवड सुरू

Rice cultivation : मालवण, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्यांतही शेतकऱ्यांनीही या कामाला प्रारंभ केला आहे.
Konkan Rice Farming: जिल्ह्यात यंदा ६३ हजार हेक्टरवर भात लागवड,  दमदार पावसामुळे रोप पुनर्लागवड सुरू
Konkan Rice sakal
Updated on

Sindudrugh: जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील भातरोप पुनर्लागवडीला प्रारंभ झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात तयार करण्यात आलेल्या १० टक्के भातरोप वाटिकांमधील भातरोपांची पुनर्लागवड आता सुरू झाली आहे. दरम्यान, नियमित भातरोप पुनर्लागवड देखील येत्या पाच-सहा दिवसांत सुरू होणार असून, यावर्षी साधारणपणे ६३ हजार हेक्टरवर भातपीक लागवड होईल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात तीन टप्प्यांत भात रोपवाटिका तयार केल्या जातात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता असते, असे शेतकरी मे अखेरीस भात रोपवाटिका तयार करतात. तर काही शेतकरी मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर भात रोपवाटिका तयार करतात. भात उत्पादक शेतकरी हळवा, निमगरवा आणि गरवा अशा बियाण्यांचा वापर करतात. यामध्ये संकरित, सुधारित आणि पांरपरिक बियाण्यांचाही समावेश असतो. यावर्षी मे अखेरीला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात भात रोपवाटिका तयार केल्या होत्या. त्यामधील भात रोप पुनर्लागवड करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

Konkan Rice Farming: जिल्ह्यात यंदा ६३ हजार हेक्टरवर भात लागवड,  दमदार पावसामुळे रोप पुनर्लागवड सुरू
Konkan Graduate Election : 36 करोडचा आमदार निधी डावखरेंनी कुठे वापरला? अपक्ष उमेदवार निमकरांचा भाजप उमेदवाराला सवाल

सध्या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातरोप पुर्नलागवडीला प्रारंभ केला आहे. वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी, कोकिसरे, खांबाळे, नापणे, नाधवडे या गावांमध्येही सुरुवात केली आहे. कणकवली तालुक्यातील चिंचवली, खारेपाटण, शेर्पे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भातरोप पुनर्लागवड सुरू झाली आहे. याशिवाय मालवण, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्यांतही शेतकऱ्यांनीही या कामाला प्रारंभ केला आहे.

Konkan Rice Farming: जिल्ह्यात यंदा ६३ हजार हेक्टरवर भात लागवड,  दमदार पावसामुळे रोप पुनर्लागवड सुरू
Konkan Tourism : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटकांची संख्या रोडावली; काय आहे कारण?

चार दिवसांत १० टक्के पूर्णत्वास

जिल्ह्यात १० टक्के क्षेत्रावरील पुनर्लागवड येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. दरम्यान, यावर्षी नियमित भातरोप पुनर्लागवडीला देखील येत्या चार-पाच दिवसांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाणथळ जमिनीतील लागवडी करण्यास संधी असल्यामुळे शेतकरी अशा ठिकाणी भातरोप लागवड करीत आहेत.

Konkan Rice Farming: जिल्ह्यात यंदा ६३ हजार हेक्टरवर भात लागवड,  दमदार पावसामुळे रोप पुनर्लागवड सुरू
Konkan Graduate Election: डोंबिवलीतील पदवीधरांचा कोकण पदवीधर मतदानावर बहिष्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.