Konkan Tourism : हिरवेगार जंगल अन् निळाशार धबधबा..; हा निसर्गसोहळा अनुभवायचाय असेल, तर 'या' गावाला जरुर भेट द्या..

चोरवणे गाव हे चिपळूण आणि खेडच्या सीमारेषेवर येते. गावाला संपूर्णपणे तासलेल्या सह्यकड्यांनी वेढलेले आहे.
Choravane Khed
Choravane Khedesakal
Updated on
Summary

गावाला संपूर्णपणे तासलेल्या सह्यकड्यांनी वेढलेले आहे आणि मध्येच हे गाव आहे. या गावातूनच ट्रेकरचा आवडीचा नागेश्वरी सुळका आणि वासोटा किल्ला गाठता येतो.

-पराग वडके, रत्नागिरी parag.vadake@gmail.com

संपूर्ण हिरवेगार असलेले जंगल (Forest) आणि मध्येच निळ्या रंगाचा चित्रपटात दिसणारा अतिशय देखणा धबधबा. प्रथमच निळ्या रंगाचा धबधबा (Waterfall) पाहत होतो आणि भान हरपणे म्हणजे काय ते अनुभवायला येत होते. धबधबा पाहून होतो न होतो तोच थोडं पुढे गेल्यावर दुसरा धक्का बसत होता. एवढे वर्ष पडझड झालेली एका रात्रीत बांधलेली पांडवकालीन भग्न मंदिरे पाहायची सवय झालेली आणि अचानक अतिशय सुरेख पांडवकालीन वगैरे वाटावे असे मंदिर हिरव्यागार कोंदणात काळ्याकभिन्न दगडात पाहून दुसऱ्यांदा भान हरपत होते. पुढे तिसरा धक्का होता.

संध्याकाळची दिवेलागणीची वेळ होती. अचानक ते काळेकभिन्न वास्तुसौंदर्य उजळून निघाले आणि घंटानाद होऊ लागला. अवघा सह्याद्री ध्यानस्थ होऊन त्या शांत उजेडात आणि घंटानादात डोलू लागले. आम्ही अक्षरशः त्या उजेडाच्या प्रवाहात अलगद तरंगत देवालयाच्या दिशेने ओढले जाऊ लागलो. आत अप्रतिम मूर्तीसौंदर्य नखशिखांत दागिन्यात उजळले होते. मूर्तीच्या चेहऱ्यावर प्रचंड सात्विक भाव होते. मंदिराचा पुजारी एका सुरेल तानेत देवीचे स्तुतिगीत गात होता आणि समोर मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीतू शंभू महादेवाचे जागरूक देवस्थान नागेश्वरी संपूर्ण परिसरावर पहाडी आवेशात ठाम उभे होते.

Choravane Khed
Sahyadri Valley : पाऊस, वादळ आणि पक्षीजीवन (भाग एक)

आजपर्यंतच्या आयुष्यात एवढ्या सुरेख वातावरणात पाहिलेली ही एकमेव आरती आहे. तिरुपतीची आरती आठवली. नकळत तुलना झाली आणि किंचित पारडे या भानामतीचे जड झाले. हे सर्व अनुभवायचे असेल तर तुम्हाला थेट गाठायला लागेल ते खेड तालुक्यातील चोरवणे गाव (Choravane Khed). चोरवणे गाव हे चिपळूण आणि खेडच्या सीमारेषेवर येते. गावाला संपूर्णपणे तासलेल्या सह्यकड्यांनी वेढलेले आहे आणि मध्येच हे गाव आहे. या गावातूनच ट्रेकरचा आवडीचा नागेश्वरी सुळका आणि वासोटा किल्ला गाठता येतो.

Choravane Khed
Konkan Port : 'कोकणातल्या कोणत्याच बंदरात बोट लागावी अशी बंदरेच उरली नाहीत'

येथील देवीचे प्राचीन मंदिर सर्वांनाच आनंद देणारे आहे. या मंदिराचे मानकरी महादजी शिंदे, रावजी चंजाळ (सुतार), नवबोधबिन काजनाक (उर्फ आर्या), गावातील मोरे, भोसले, कदम, जाधव, उत्तेकर, चव्हाण, सकपाळ असे आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार २० फेब्रुवारी २०१८ ला झाला. यापूर्वी हे मंदिर १९२० या कालखंडापूर्वी चोरवणे गावठाण या ठिकाणी होते. दोन्ही बाजूंनी नदीचे पात्र असणारे हे ठिकाण घनदाट अरण्यात होते. तत्कालीन समाज, मुघल साम्राज्य, ब्रिटिश राजवट, स्थानिक चोरट्या जमाती यापासून स्वतःची देवीची आणि संस्कृतीची रक्षा करण्याच्या उद्देशाने पाच शतक हे मंदिर गावठाण ठिकाणी होते. त्या वेळी मंदिराची इमारत साध्या पद्धतीने होती. त्या कारणाने देवीची संपत्ती रूप्या, टाके एका गुपित गुहेत सुरक्षित ठेवले जात असे. हळूहळू काळ बदलत गेला आणि एक सुंदर असे मंदिर घडवण्यात यश आले.

Choravane Khed
Yakub Baba Dargah : 'या' भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या घुमट नसलेल्या दर्ग्याची दंतकथा

मंदिराच्या खजिन्यात प्राचीन ताम्रपटसुद्धा आहे. मंदिराची पुराणकथा श्रीराम आणि सीतामाई भेट या संदर्भातील ऐकायला मिळते. मंदिरात श्री झोलाई, श्री वाघजाई, श्री मानाई, गुडाई, पाऊनाई, खेड्जाई माता हे मंदिर पांडवकालीन वाटावे असे कसे बांधले असा प्रश्न होता. त्याचे उत्तरसुद्धा वेबसाईटवर मिळाले ते असे. आपणास हे मंदिर अतिशय सुंदर दिसते; परंतु त्यामागे फार मोठा इतिहास आहे आणि तो जाणून घेणंदेखील तितकच महत्त्वाचे आहे. मंदिरबांधणी कोणत्या पद्धतीने करावी हे फार मोठे कोडे होते; परंतु देवीने कौल देऊन पाशाणी पुरातन काळी पद्धतीनेच बांधावे असे सांगितले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित मंडळी एकत्र येऊन इतिहास मंदिरांना भेटीचे कार्यक्रम सुरू झाले. अखेर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील वयोवृद्ध शिल्पकार कैलासवासी पाथरूड यांनी या कामासाठी सहमती दर्शवली आणि यांच्या कल्पनेतून या मंदिराची पायाभरणी झाली.

Choravane Khed
Milk Collection : दूध संकलनात तब्बल सव्वातीन लाख लिटरची घट; शेतकऱ्यांना प्रतिदिन 1.25 कोटींचा फटका

मंदिर हेमांडपंथीय असून मंदिरासाठी लागणारे दगड कोल्हापूर, निपाणी (कर्नाटक) येथील प्रमुख खाणीतून आणण्यात आला. मंदिराची जागा ३५ गुंठे असून, गाभारा १५ बाय १५, कळस ४० फूट उंच, पालखी आसन २५ बाय ११, झोलाई, मानाई वाघजाई गाभारा १३ बाय १३, सभामंडप २५ बाय ३०, जोते ४ फूट, गाभाऱ्यातील जोते ६ फूट उंचीचे आहे. मुख्य प्रवेशद्वार १० फूट रूंद आणि २४ फूट उंच पाषाणी नक्षीदार आहे. दक्षिणद्वार १४ फूट उंच आहे. या मंदिराला ४ फूट उंची असलेली तटबंदी आहे. मंदिराचे भूमिपूजन १०८ नीलकंठ शिवाचार्य महास्वामी आदीमठाध्यक्ष धारेश्वर महाराज पाटण जिल्हा सातारा यांच्या शुभ हस्ते कार्तिक कृ. षष्ठी १९२९ गुरूवारी २९ नोव्हेंबर २००७ ला झाली. निसर्गसोहळा अनुभवायचा असेल तर जरूर चोरवणे गावाला भेट दिलीच पाहिजे.

- क्रमशः

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.