जून संपत आला तरी आंबोलीत हवे तसे वर्षा पर्यटन सुरू झाले नव्हते. मात्र, परिसरात आज झालेल्या दमदार पावसामुळे येथील मुख्य धबधब्यासह लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत.
आंबोली : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon Season) जिल्ह्यातील तसेच कोकणातील वर्षा पर्यटनाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा (Amboli Waterfall) प्रवाहित झाला आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आता पर्यटकांचा ओघ आंबोलीत सुरू होणार आहे.
पावसाळा सुरू झाला की तरुणाईला ओढ लागते ती धबधब्यांची. तरुणाईला याची मोठी उत्सुकता असते. जून संपत आला तरी आंबोलीत हवे तसे वर्षा पर्यटन सुरू झाले नव्हते. मात्र, परिसरात आज झालेल्या दमदार पावसामुळे येथील मुख्य धबधब्यासह लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे आजपासून आंबोली वर्षा पर्यटनाला अखेर सुरुवात होणार आहे. सध्या काही प्रमाणात गर्दी होत होती. मात्र, येत्या शनिवारसह रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे.
मुंबई, पुणे, महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, गोवा तसेच इतर राज्यातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. हॉटेल, लॉजिंग तसेच छोटे-मोठे व्यवसायिकदेखील आता सज्ज झाले आहेत. पोलिस प्रशासनही येथील वर्षा पर्यटनावर लक्ष ठेवून आहे. एकूणच आता वर्षा पर्यटनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असल्याने येथील कावळेसाद, महागड पॉईंट, चौकुळ परिसर, बाबा धबधबा यांसारख्या ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळणार आहे. पर्यटकांनी काळजीपूर्वक वर्षा पर्यटनाचा लाभ घ्यावा, पोलिसांना सहकार्य करावे, घाटात तसेच पर्यटनस्थळी कचरा करु नये, असे आवाहन पोलिस, वनविभाग तसेच आंबोली ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.