Konkan Tourism : देवगड तालुक्यातील 'हे' धबधबे झाले प्रवाहित; कोकणात वर्षा पर्यटन बहरण्यास सुरूवात

उन्हाळी पर्यटन संपून व्यावसायिकांना वर्षा पर्यटनाचे वेध लागतात.
Konkan Tourism
Konkan Tourismesakal
Summary

अलीकडे पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोकणात येतात.

देवगड : उन्हाळी पर्यटन हंगाम (Summer Tourist Season) संपून काही मोजकेच दिवस झाले असताना आता तरूणाईला पावसाळी पर्यटनाचे वेध लागले आहेत. तालुक्यातील ठिकठिकाणचे धबधबे (Waterfalls) पावसामुळे प्रवाहित झाले आहेत. सुरूवातीला जोराचा पाऊस झाल्याने नैसर्गिक धबधबे प्रवाहित होऊन वर्षा पर्यटन बहरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे तरूणाई धबधब्यावर आनंद घेण्यासाठी जात असल्याचे चित्र आहे.

अलीकडे उन्हाळी पर्यटन तालुक्यात जोरात असते. या काळात शाळांना सुटी असल्याने तसेच आंबा, फणस आदी कोकणी मेव्याची रेलचेल असल्याने पर्यटकांचा या भागात ओढा असतो. यामुळे किनारी भागातील पर्यटन बहरलेले असते. तसेच सलग सुटीचा आधार घेत पर्यटक (Tourists) कोकण भ्रमंतीला येतात. पर्यटन व्यवसायातून चांगली आर्थिक उन्नती साधण्यास मदत होते. निवास न्याहारीबरोबरच शीतपेय, रसवंतीगृहे तसेच चहा, भजीचे स्टॉलही या काळात पूर्ण क्षमतेने गजबजलेले असतात.

Konkan Tourism
Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

येथील स्वच्छ समुद्रकिनारे तसेच विजयदुर्गपासून कुणकेश्‍वरपर्यंतचा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. यामुळे पर्यटनातून मोठी आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते. मात्र, त्यानंतर उन्हाळी पर्यटन संपून व्यावसायिकांना वर्षा पर्यटनाचे वेध लागतात. नुकत्याच शाळा सुरू झाल्याने उन्हाळी पर्यटन संपुष्टात आले आहे. यंदा पावसाचे वेळीच आगमन झाले. सुरूवातीलाच दमदार पाऊस झाला. पर्यायाने नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तरूणाईने धबधब्याखाली मनसोक्त आनंद घेण्यास सुरूवात केली आहे.

सुटीचा दिवस असल्यास धबधब्यावर मोठी गर्दी असल्याचे दिसते. अलीकडे पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. महिलांचाही समुह वर्षा पर्यटनाचे बेत आखतात. त्यामुळे वर्षा पर्यटनातून आर्थिक उलाढाल होण्यास मदत होत आहे. तालुक्यात तळवडे, मणचे आणि शिरगांव पाडागर येथील धबधब्यावर मजा घेण्यासाठी तरूणाई जात असल्याचे दिसून येत आहे. एकूणच वर्षा पर्यटनाची चाहूल लागली आहे.

Konkan Tourism
Sinhagad Ghat : सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसह वाहनांसाठी महत्त्वाची बातमी; वन विभागानं घेतला 'हा' निर्णय, काय आहे जाणून घ्या..

ओहळांकडेही गर्दी

ग्रामीण भागात काही ठिकाणी धबधबे नसले तरी नैसर्गिक ओहोळातील पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. अशा ठिकाणी पोहण्याचा तसेच पाण्यात डुंबण्याचा आनंद स्थानिक घेत आहेत. आता भात लावणीचा काळ सुरू होईल. अशावेळी लावणी करताना अंगावरील चिखल साफ करण्याच्या निमित्ताने तरुणाई ओहोळातील पाण्यात डुंबून आनंद घेते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com