गुहागर हे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते.
गुहागर : कोकणातील पर्यटन (Konkan Tourism) केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागरची (Guhagar) ओळख सातासमुद्रापार पोहचली आहे. इथल्या पर्यटनस्थळांबरोबरच पर्यटक आता किनाऱ्यावरील थर्टी फर्स्ट पार्टीसाठी (31st Party) पसंती देत आहेत. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरू लागली आहेत.
पर्यटक दरवर्षी गुहागरात वेगवेगळ्या हंगामात मोठी गर्दी करत असतात. पर्यटनासाठी सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत.
निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी, प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. वर्षातून नाताळ सुट्टी व ३१ डिसेंबरला गुहागर पर्यटकांनी फुल्ल होऊन जातो. एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयाच्या सुट्ट्यांमुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक गुहागरात धाव घेतात.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुहागर चौपाटीवर समुद्रातील बोटिंग, घोडेस्वार, उंट सफारी, खाद्यपदार्थांचे स्टॉल सज्ज झाले आहेत. शिवाय हॉटेल लॉज व घरगुती राहण्याच्या व्यवस्थाही पर्यटकांच्या स्वागताची तयारी करताना दिसत आहेत. १५ डिसेंबरपासून गुहागर शहर व अन्य देवस्थाने आणि प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी पर्यटक गर्दीने दिसू लागले आहेत.
तालुक्यात सुमारे ५६ हॉटेल, ३५ एमटीडीसी निवासस्थाने व ७५ घरगुती निवास आणि राहण्याची यापेक्षाही जास्त व्यवस्था आहे. पूर्वी गुहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक सलग तीन ते चार दिवस वास्तव्य करू लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटनस्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे.(Tourist stay)
गुहागर हे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते. पर्यटनाने येथील जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे चित्रपटांचे चित्रीकरणाचे प्रमाण वाढले आहे. शिवाय स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे विविध क्षेत्रातील मंडळी भेटी देत असतात. ही वाढत्या पर्यटनाची पोच आहे.
-शामकांत खातू, हॉटेल व्यावसायिक, गुहागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.