कोयना प्रकल्पाचे होणार खासगीकरण ? बीओटी तत्त्वानुसार प्रकल्पांची देखभाल-दुरुस्ती

प्रकल्पाची खासगीकरणाकडे वाटचाल
kokan
kokansakal
Updated on

चिपळूण : महानिर्मितीकडे हस्तांतरित होऊन पस्तीस वर्षे पूर्ण झालेले प्रकल्प देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित केले जात आहेत. त्यानुसार कोयनेचा तिसरा टप्पा आणि कोयना धरण पायथा विद्युत ग्रह पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रजनीश रामकिशोर शुक्ला यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. बीओटी तत्त्वानुसार या प्रकल्पांची देखभाल-दुरुस्ती होणार असल्यामुळे कोयना प्रकल्पाची वाटचाल आता खासगीकरणाकडे सुरू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

महाराष्ट्र राज्यात जलविद्युत प्रकल्पांची उभारणी जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फत करण्यात येते. प्रचलित कार्यनियमावली नुसार हे प्रकल्प उभारणीनंतर भाडेपट्टी तत्वावर परिचलन व देखभालीसाठी महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात येतात. यानुसार २५९२.२७ स्थापित क्षमता असलेले २७ जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे ३५ वर्षाकरिता भाडेपट्टीने हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत.

जलविद्युत प्रकल्पातून होणाऱ्या वीजनिर्मिती पासून योग्य महसूली रक्कम राज्य शासनास प्राप्त होणे आवश्यक असल्यामुळे जलसंपदा विभागाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून भाडेपट्टीची सुधारित रक्कम आयोगाच्या २७ ऑक्टोबर २००८ रोजीच्या आदेशाद्वारे निश्चित केलेली आहे . सदर आदेशानुसार वीर व भाटघर जलविद्युत प्रकल्पाचे नियत ३५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे भाडेपट्टी मिळणे बंद झाली असल्याने सदर प्रकल्प जलसंपदा विभागाकडे परत घेण्याचा निर्णय सन २०१० साली झाला आहे. सदर प्रकल्प नुतनीकरण व आधुनिकीकरण करणे व त्यानंतर परिचलनाकरिता बीओटी तत्वावर खाजगी प्रवर्तकास देण्यात आला आहे.

kokan
भाजपच्या BOT मोहिमेला धक्का; सातबाऱ्यावर महापालिकेचे नावच नाही

जलसंपदा विभागामार्फत उभारणी व कार्यान्वित केलेले व महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरीत केलेले ३५ वर्ष आयुर्मान पूर्ण झालेले येलदरी ( ३x७.५ मेगावॅट ) , वैतरणा ( १x६० मेगावॅट ) , भाटघर ( १x१६ मेगावॅट ) , कोयना धरण पायथा ( २x२० मेगावॅट ) , कोयना ३ टप्पा ( ४x८० मेगावॅट ) , पैठण ( जायकवाडी ) ( १ x १२ मेगावॅट ) हे जलविद्युत प्रकल्प नूतनीकरण व आधुनिकीकरण करणेसाठी पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे निश्चित झाले आहे. या जलविद्युत प्रकल्पांच्या भविष्यातील सुस्थितीत कार्यन्वयाच्या दृष्टीने तसेच त्यांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी विहीत आयुर्मान पूर्ण झालेल्या व महाजेनेकोकडून भाडेपट्टी येणे बंद झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचे वीर जलविद्युत प्रकल्पाच्या धर्तीवर " नूतनीकरण व आधुनिकीकरण करणे व त्यानंतर परिचलन करणे " या एकत्रित व्याप्तीनुसार BOT तत्वावर निविदा मागवण्यात येणार आहे.

kokan
Budget 2021 : सैन्यदलांचे आधुनिकीकरण रखडणार;सीमेवर तणाव तरीही तुटपुंजी तरतूद

तिसरा टप्पा जुलै 1975 ते ऑक्टोबर 1977 दरम्यान कार्यान्वित झाला. नोव्हेंबर 1977 ला तो महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. पायथा विद्युत ग्रह ऑक्टोबर 1980 ते मार्च 1981 दरम्यान कार्यान्वित झाला. सप्टेंबर १९८२ला तो महानिर्मितीकडे हस्तांतरित झाला.त्यामुळे इतर प्रकल्पानुसार कोयना प्रकल्पाचे खाजगीकरण होणार हे आता निश्चित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.