कोकण रेल्वेवर युतीचा झेंडा; मडगाव रेल्वेस्टेशनवर जल्लोष

`केआरसी`शी आघाडी ः नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पराभूत
कोकण रेल्वेवर युतीचा झेंडा; मडगाव रेल्वेस्टेशनवर जल्लोष
Updated on

कुडाळ: कोकण रेल्वेच्या निवडणुकीत केआरसी एम्प्लॉईज युनियन आणि रेल कामगार सेना या युतीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पराभूत करत कोकण रेल्वेवर (बेलापूर ते ठुक्कुर) युतीचा झेंडा फडकविला.

Summary

कण रेल्वेच्या निवडणुकीत केआरसी एम्प्लॉईज युनियन आणि रेल कामगार सेना या युतीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पराभूत केले.

कोकण रेल्वेच्या निवडणुकीत केआरसी एम्प्लॉईज युनियन आणि रेल कामगार सेनेने युती केली होती. त्यांच्यासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन रिंगणात होते. युतीला २९५३ मते तर नॅशनल मजदूरला २०२९ मते मिळाली. युती ९२४ मतांनी विजयी झाली. केआरसी युनियनचे अध्यक्ष सुभाष माळगी व रेल कामगार सेनेचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक लढविली होती. प्रचार यंत्रणा, मिरवणूक आदीने या निवडणुकीत रंगत आली होती. मडगाव गोवा येथे निकाल जाहीर झाल्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात मडगाव रेल्वेस्टेशन परिसर दणाणून गेला. यावेळी केआरसी एम्प्लॉइज युनियनचे कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर, जनरल सचिव मोहन खेडेकर, संघटनात्मक सचिव सारंग, मास्टर जयराम नायर, राजस देसाई, रेल कामगार सेनेचे जनरल सचिव राजू सुरती, नेते संजय जोशी, बाबी देव, नरेंद्र शिंदे, स्वप्नील जेमशे, ए. पी. राज, अनिकेत धवल, परेश राऊत, अनिल सांगळे, व्ही. आर. सावंत, जी. के. दळवी, सी. डी. सोंसुरकर, चंदन गुरव, मोहन मधुकर, व्ही. के. कुडाळकर, संतोष कुंभार, एस. के. परब, दिनेश महाडेश्वर, गोपाळ नागवेकर, तुषार राऊळ, गजानन जाधव, गुणाजी चव्हाण, वामन नाईक, जे. बी. कदम, व्ही. एस. सावंत, पुराणिक, श्रीमती स्नेहा यांच्यासह युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोकण रेल्वेवर युतीचा झेंडा; मडगाव रेल्वेस्टेशनवर जल्लोष
पुढील पाच दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

यावेळी केआरसीचे नेते गाळवणकर म्हणाले, ``नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या माध्यमातून सातत्याने कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला होता. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हा होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही युतीच्या माध्यमातून काम करणार आहोत.`` रेल कामगार सेनेचे नेते स्वप्नील जेमशे यांनीही कोकण रेल्वे कामगारांचे प्रश्न फक्त केआरसी एम्प्लॉइज युनियन व रेल कामगार सेनाच सोडवु शकते. भविष्यात कामगारांच्या न्याय्य प्रश्नासाठी लढणाऱ्या युतीला या निवडणुकीत विजयी करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार तुम्ही विजयी केलात तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. निवडणूकीत एसी, एसटी असोसिएशन, पॉईंटमन, ट्रॅकमन असोसिएशनने संपूर्ण पाठींबा दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()