Maratha Reservation : 'मराठ्यांचे कुणबीकरण केल्यास भविष्यात मराठा जातच नष्ट होईल'

मराठ्यांचे कुणबीकरण केल्यास भविष्यात मराठा जातच नष्ट होईल.
Kshatriya Maratha Community
Kshatriya Maratha Communityesakal
Updated on
Summary

कोकणातील मराठा समाज स्वाभिमानी आहे. आम्ही वेगळी भूमिका घेतली तरी समाजात फूट पाडण्याचा हेतू नाही. ज्यांना कुणबी म्हणून दाखले हवेत त्यांनी ते स्वीकारावेत.

चिपळूण : कोकणात मराठा-कुणबी समाजात (Maratha-Kunbi Community) वाद नाहीत. येथील जातीव्यवस्था, रितभात वेगळी आहे. मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळायला हवे. मराठ्यांचे कुणबीकरण केल्यास भविष्यात मराठा जातच नष्ट होईल. यातून कोणत्याही जातीला कमी लेखण्याचा हेतू नाही. त्यामुळे शासनाने कोकणातील मराठ्यांना मराठा म्हणून टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी चिपळुणात झालेल्या क्षत्रिय मराठा समाजाच्या कोकण (Konkan) मेळाव्यात करण्यात आली.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) समाजात जागृती होण्यासाठी शहरातील भैरी मंदिराजवळील मैदानात बुधवारी कोकण प्रांत मराठा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासह रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, कोल्हापूर येथील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात सुधीर राजेभोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा इतिहास सांगितला.

Kshatriya Maratha Community
Kolhapur Politics : 'बंटीं'च्या बालेकिल्ल्यात 'मुन्नां'ची बुलेट सवारी; कोल्हापुरात राजकीय चर्चांना उधाण

मेळाव्याचे समन्वयक राजन घाग म्हणाले, ‘‘कोकणातील मराठा समाज स्वाभिमानी आहे. आम्ही वेगळी भूमिका घेतली तरी समाजात फूट पाडण्याचा हेतू नाही. ज्यांना कुणबी म्हणून दाखले हवेत त्यांनी ते स्वीकारावेत. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, शासनाने आम्हाला टिकणारे आरक्षण मराठा म्हणूनच द्यावे. ओसीबीत ३५१ जातींचा समावेश असल्याने त्यातच मराठा समाजाला आरक्षण दिल्यास लोकसंख्येच्या तुलनेने या समाजाला न्याय मिळणार नाही. कुणबी म्हणून आरक्षण मिळाल्यास तिसऱ्या पिढीत मराठा जात नष्ट होईल.’’

मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र कोंढरे म्हणाले, ‘‘सोशल मीडियावर मराठा समाज आरक्षणाबात संभ्रम करणारे लेखन करू नये. ओबीसीतील ठराविक जातीच मराठ्यांना विरोध करत आहेत. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्याने आरक्षणात असलेली दरी काही प्रमाणात भरून निघाली, हे आंदोलनाचे यश मानावे लागेल.’’

Kshatriya Maratha Community
महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकात हस्तक्षेप खपवून घेणार नाही; 'या' योजना लागू केल्याने सिद्धरामय्या संतापले

आरक्षण मिळण्यासाठी चार पर्याय

  • मराठा कुणबी प्रमाणपत्र घेतल्यास ओबीसीतून

  • खुल्या प्रवर्गातील १० टक्के राखीवमधूनही

  • १० टक्क्यांत ८ टक्केच मराठा समाजाला लाभ

  • मागासवर्ग आयोगाद्वारे मागासलेपण सिद्ध करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.