कुडाळ नगरपंचायत निवडणुक : 13 प्रभागात ४०-४५ टक्के मतदान

41 उमेदवार रिंगणात असून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.
Kudal Election
Kudal ElectionSakal
Updated on

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत च्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 13 प्रभाग मध्ये आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली दुपारच्या सत्रात सरासरी 40 ते 45 टक्के मतदान झाले 13 प्रभागात 41 उमेदवार रिंगणात असून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.

कुडाळ शहरातील कविलकाटे, भैरववाडी, बाजारपेठ, कुडाळेश्वरवाडी, गांधी चौक, आंबेडकर, मज्जित मोहल्ला तुपटवाडी, नाबरवाडी, वाघ सावंतटेम्ब गणेश नगर, हिंदू कॉलनी, श्रीरामवाडी, अभिनव नगर, कुंभारवाडी या तेरा प्रभागामध्ये आज सकाळीच शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली नगरपचायतमध्ये सतरा प्रभाग येतात त्यामध्ये उर्वरित चार प्रभागामध्ये प्रभाग तीन लक्ष्मीवाडी प्रभाग 10 केळबाईवाडी प्रभाग 16 एमआयडीसी प्रभात सतरा सांगिर्डेवाडी या प्रभागात निवडणूक ओबीसी आरक्षणावरील न्यायालय निर्णयामुळे स्थगित करण्यात आली होती.

Kudal Election
पुणे : शहरावर पहाटेच्या धुक्याची झालर; पहा फोटो

आताही खुल्या प्रवर्गासाठी निवडप्रक्रिया सुरू झाली असून 29 डिसेंबर 13 जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करायची आहेत 23 ला आरक्षण पडेल 18 जानेवारी रोजी मतदान होईल. 19 रोजी एकाच वेळी सर्व प्रकारची मतमोजणी होणार आहे. कुडाळ नगरपंचायत जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेची नगरपंचायत मानली जाते तेरा प्रभागमध्ये मतदान केंद्राध्यक्ष सहायक पोलीस कर्मचारी मिळून 65 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कुडाळ शहरात खास पोलीस गस्त आहे. तसेच विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज चार नगरपंचायतच्या निवडणुकाचे मतदान होत आहे. मात्र सर्वाची नजर ही नगर पंचायतीकडे लागली आहे तेरा प्रभागमध्ये होणाऱ्या निवडणूकामध्ये सर्वाधिक लक्ष प्रभाग 12 हिंदूकॉलनी याकडे आहे. या ठिकाणी जिल्हा माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक काका कुडाळकर व भाजपच्या जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष व नगरसेविका संध्या तेरसे आहेत ही लढत अतिशय महत्त्वाची असणार आहे.

Kudal Election
कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी सरासरी पंचावन्न टक्के मतदान

आज प्रभागनिहाय दौरा केला असतां सर्व बुथवर शिवसेना राष्ट्रवादीभाजप व काँग्रेसचे बूथ दिसून आले. अभिनवनगर येथे काँग्रेसचा उमेदवार रिगणात होता. पण बूथ नव्हता अतिशय शांततेत दुपारपर्यत मतदान प्रक्रिया पार पडली सर्वजणच मतदारांना बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.