गावाचे मुख्य प्रवेशद्वार लांब असून हलकी पावले वाजली तरी गावात समजत असे. या गावात साधारण ५ हजार लोक राहायचे.
-पराग वडके, चिपळूण,
parag.vadake@gmail.com
मी नि माझा मित्र प्रवीण सकाळीच साडेपाचला उठून धावत पुन्हा सामच्या वाळवंटात सकाळ कधी होते आणि सूर्यनारायण कधी दिसतोय याची वाट बघत होतो. आम्ही वाळूत पाय खुपसत सर्वात उंच टेकडी शोधत वर जाऊन बसलो आणि तो आला नेहमीप्रमाणे जोशात भगवा फेटा घालून. फटाफट फोटो काढले, सेल्फी झाले. पाच-दहा मिनिटांत स्वामी ड्युटीवर रूजू झाले आणि वरून डोकावू लागले आणि पाकिस्तानच्या बाजूला सरकले. जणूकाही सीमारेखा तुमच्या तुच्छ मानण्याच्या माझी सीमाच नाही, असे म्हणत तो अजून वर सरकला.