मुंबई-गोवा महिनाभरापूर्वी मोठी दरड कोसळली होती. ती दरड बंद असलेल्या लेनवर तशीच आहे.
चिपळूण : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटात (Parshuram Ghat) दगडमाती व काही प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक थांबवण्यात आली. दरड खाली येत असल्याचे लक्षात येताच दोन्हीकडील वाहने थांबवण्यात आली.
यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर आलेली दगडमाती बाजूला केल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेची माहिती चिपळूण पोलिस आणि महसूल प्रशासनाला मिळताच अधिकाऱ्यांनी परशुराम घाटात धाव घेतली. या वेळी वाहतूक सुरू असणाऱ्या लेनवर दरडमाती आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक रोखून दगडमाती तत्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट संवेदनशील ठरला असून, गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. या ठिकाणी २४ तास देखरेख करण्यात येणार असून, दुर्दैवाने दरड कोसळल्यास डंपर, जेसीबी, तैनात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, घाटातील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
मुंबई-गोवा महिनाभरापूर्वी मोठी दरड कोसळली होती. ती दरड बंद असलेल्या लेनवर तशीच आहे. त्यामुळे आता या दरडी नव्याने दगडमाती कोसळून ती वाहतूक सुरू असलेल्या लेनवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्ग ठेकेदार कंपनीने ही दरड तत्काळ हटवावी, अशी मागणी होत आहे, अन्यथा आगामी काळात दरड कोसळल्यास ती महामार्गावर येण्याचा धोका आहे.
कणकवली : दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे फोंडाघाट येथे दरड कोसळी. सार्वजनिक बांधकामच्या पथकाने दुपारी एकला दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता के.के.प्रभू, शाहू शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
जेबीसीच्या साहाय्याने घाटमार्गातील दगड बाजूला करण्यात आले. त्यानंतर दुपारी एकला घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला; मात्र सायंकाळी चार पर्यंत घाट मार्गात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही प्रमाणात दगड माती खाली येत होती. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, खारेपाटण तलाठी अरुणा जयानावर यांनीही घटनास्थळी पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.