Anuskura Ghat : कोकणाला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात कोसळली दरड; सात तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प

Anuskura Ghat : मातीच्या ढिगार्‍याखाली मोठमोठे असलेल्या दगडांमुळे रस्ता मोकळा करण्याच्या कामामध्ये सातत्याने व्यत्यय येत आहे.
Anuskura Ghat
Anuskura Ghatesakal
Updated on
Summary

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे मुंबईतून कोकणात येणारी वाहने पुणे मार्गे अणुस्कुरा घाटातून कोकणात येण्याला पसंती देताना दिसत आहेत.

राजापूर : कोकण परिसराला घाटमाथ्याशी जोडणारा आणि शॉर्टकट मार्ग म्हणून वाहनचालकांच्या पसंतीस उतरलेल्या अणुस्कुरा घाटामध्ये (Anuskura Ghat) आज पहाटेच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली. घाटातील पिकनिक स्पॉटपासून वरच्या बाजूला काही अंतरावर ही दरड कोसळली. त्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे गेल्या सात तासापासून कसोशीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.