वाहनांची नियमित वर्दळ असलेल्या या घाटात दरड कोसळण्याची यावर्षीची ही पहिलीच घटना ठरली आहे.
राजापूर : काल दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असताना पश्चिम महाराष्ट्राशी रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात (Anuskura Ghat) दरड कोसळण्याची घटना काल (गुरुवार) सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरड कोसळण्याची यावर्षीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे घाटातील सुरक्षित प्रवासासह घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान, घाटातील रस्त्यात सायंकाळी कोसळलेली दरड आणि माती काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) तात्काळ प्रयत्न सुरू झाले आहेत.
तशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी दिली. यामुळे लवकरच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होण्याचे सकारात्मक चिन्ह दिसत आहे. गत आठवड्यात माॅन्सून सक्रिय झाला असून तेव्हापासून तालुक्यामध्ये कमी-जास्त प्रमाणात पडत आहे. आज तालुक्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर होता. त्यामध्ये बाकाळे येथे घरांचे नुकसान झालेले असताना सायंकाळी उशिरा अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली.
यामध्ये दगड आणि मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वाहनांची नियमित वर्दळ असलेल्या या घाटात दरड कोसळण्याची यावर्षीची ही पहिलीच घटना ठरली आहे. या अणुस्कुरा घाट मार्गद्वारे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडले गेले आहे. कोकणामध्ये ये-जा करण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून या घटमार्गाची ओळख आहे. त्यामुळे या मार्गाने वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.