दगड, माती आणि झाडांचा मोठा भराव रस्त्यावर आल्यामुळे मार्गच बंद झाला. परिणामी वाहतूक ठप्प झाली.
वैभववाडी : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून वैभववाडी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात (Bhuibawada Ghat) काल दुपारी पावणे चारच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Meteorology Department) दिला असून आज (ता. २८) ऑरेंज तर पुढील तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. २६) सावंतवाडी, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता.
त्यानंतर काल देखील दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वैभववाडी तालुक्यात दुपारी एकनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. घाटपरिसरात पावसाचा जोर अधिक होता. मुसळधार पावसामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून दोन किलोमीटरवर दरड कोसळली.
दगड, माती आणि झाडांचा मोठा भराव रस्त्यावर आल्यामुळे मार्गच बंद झाला. परिणामी वाहतूक ठप्प झाली. घाटरस्त्यात असलेली वाहने पुन्हा करूळ घाटमार्गे वळवावी लागली. घाटात दरड पडल्याची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शुभम दुडये यांनी जेसीबी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पाठविले.
जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरूवात करण्यात आली. तासाभरात एकेरी वाहतूक आणि त्यानंतर तासाभरात पूर्ण वाहतूक सुरू झाली. दरम्यान, हवामान विभागाने उद्या जिल्ह्यात आँरेज अलर्ट जारी केला असून त्यानंतर पुढील तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे. या तीन-चार दिवसांत विजांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात पुढील चार पाच दिवसांत विजांच्या लखलखाटांसह पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पाऊस किंवा विजांचा लखलखाट असताना नागरिकांनी सुरक्षित थांबावे. दूरध्वनी, भ्रमणध्वनी वापरणे, घरातून बाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.