Konkan Politics : ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटाकडे? सामंत बंधूंच्या खेळीने राजकारणात नवा ट्विस्ट

लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सामंत बंधूंच्या राजकीय खेळीने अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Lanja Rajapur Assembly Constituency Politics
Lanja Rajapur Assembly Constituency Politicsesakal
Updated on
Summary

रत्नागिरीचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

रत्नागिरी : ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये (Lanja Rajapur Assembly Constituency) सामंत बंधूंच्या राजकीय खेळीने अस्वस्थता निर्माण झाली आहे. सामंताकडून सुरू असलेल्या विकासकामांमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाकडे (Shinde Group) आकर्षित होऊ लागले आहेत.

त्यांच्या सामंत यांच्याबरोबर समझोता बैठकाही सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. रत्नागिरीचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. अनेक प्रकल्प नव्याने सुरू केले आहेत.

Lanja Rajapur Assembly Constituency Politics
Gram Panchayat Election : ओबीसींच्या 'या' जागांवर आता मराठा उमेदवारांचा दावा; कुणबी दाखला काढल्याने वाढली चुरस

रत्नागिरीसह शेजारच्याच लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे. नगरपंचायतीसह आता लांजा ग्रामीण भागाकडेही सामंत यांनी लक्ष दिले आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन ही विकासकामे होत असल्याने, सामंतांच्या निधी सिंचनाने ठाकरे सेनेचे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षिले जात आहेत.

Lanja Rajapur Assembly Constituency Politics
Maratha Reservation चा वेळीच निर्णय घ्या, अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही; आमदार शिंदेंचा स्पष्ट इशारा

त्यांचे मोठे बंधू आणि सिंधुरत्न योजनेचे सदस्य भैया सामंत यांनीदेखील त्यामध्ये लक्ष घातले आहे. यातूनच लांजा नगरपंचायतीमधील ठाकरे गटातून काही जण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून तेथील लोकप्रतिनिधींच्या सामंतांबरोबर बैठका वाढल्या आहेत. या अंतर्गत राजकारणाची आणि अस्वस्थतेची चर्चा रत्नागिरीत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.