Konkan Politics : ठाकरे गटातील नाराज नेते लवकरच शिंदे गटात येणार, राऊतांनी गळती थांबवावी; उदय सामंतांचा टोला

खासदार राऊत यांनी ही गळती थांबण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
Uday Samant vs Vinayak Raut
Uday Samant vs Vinayak Rautesakal
Updated on
Summary

एकनाथ शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील अनेक नाराज नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात लवकरच येणार आहेत. त्यांना खासदार विनायक राऊत यांनी सांभाळावे, असे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज चिपळूण येथे सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) चिपळूणच्या दौऱ्यावर होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले शिवसेनेचे अनेक आमदार पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्यास इच्छुक आहेत.

Uday Samant vs Vinayak Raut
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांनी मराठ्यांची फसवणूक केली; High Court च्या माजी न्यायमूर्तींचा गंभीर आरोप

ठाकरेंची माफी मागून ते पक्षात येण्यास तयार आहेत. लवकरच हा राजकीय भूकंप होईल, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज चिपळूणच्या दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याशी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात अनेकांना बढती मिळाली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

Uday Samant vs Vinayak Raut
Dhangar Reservation : ..म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला; पडळकरांनी सांगितलं कारण

पण, एकनाथ शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ज्या महिला नेत्यांनी आक्रमकपणे उद्धव ठाकरेंची बाजू मांडली त्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. ठाकरे गटातील अनेक नेते नाराज आहेत. यातील काहीजण शिंदे गटात येण्यास तयार आहेत. खासदार राऊत यांनी ही गळती थांबण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

Uday Samant vs Vinayak Raut
Gautami Patil : नवरात्रोत्सवात गौतमी पाटीलचा जलवा; कार्यक्रमासाठी पाच हजारावर महिला उपस्थित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.