Kondivali Dam : कोकणातील कोंडीवली धरणाची गळती थांबणार; शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा

धरण जीर्ण झाल्यामुळे धरणाला मागील काही वर्षांपासून गळती लागली होती.
Kondivali Dam
Kondivali Damesakal
Updated on
Summary

पाच वर्षांपूर्वी कोंडीवली धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोमाईट ग्रॅव्हिटी ही प्रक्रिया करण्यात आली होती.

खेड : मागील दोन वर्षांपासून कोंडीवली धरणाला (Kondivali Dam) लागलेल्या गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात धरणाच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदर धरणातील पाणी सोडण्यात आले. धरणाच्या गळतीचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने लवकरच कोंडीवली धरणाची गळती थांबण्याचे चित्र असून यामुळे कोंडीवली आणि शिवगावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आता संपुष्टात येणार आहे.

कोकण पाटबंधारे महामंडळाच्या (Konkan Irrigation Corporation) माध्यमातून जगबुडी नदीच्या प्रवाहावर कोंडीवली धरण बनवण्यात आले. हे धरण जीर्ण झाल्यामुळे धरणाला मागील काही वर्षांपासून गळती लागली होती. गतवर्षी गळती वाढल्यामुळे गळती थांबवण्यासाठी प्रक्रिया करून गळती रोखण्यासाठी धरणातील पाणी खाली करण्यात आले होते. यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती.

Kondivali Dam
वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती आता WhatsApp वर कळवा; 'महावितरण'चे नागरिकांना आवाहन

पाच वर्षांपूर्वी कोंडीवली धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोमाईट ग्रॅव्हिटी ही प्रक्रिया करण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे धरणाची ५० टक्के गळती थांबली होती तर दोन ठिकाणी गळती होत होती. त्यामुळे जिओ मेमरन प्रोसेसने काम करून धरणाची गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रक्रियेने धरण गळती कमी करण्यात यश आले असून धरणात पाणीसाठवण केले जात आहे.

Kondivali Dam
Forest Department : 'या' महागड्या झाडांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवर कुत्री पाळण्याची वेळ; काय आहे नेमकं कारण?

यामुळे यंदा कोंडीवली धरण खाली करण्याची वेळ येणार नसल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कोंडीवली धरणातून कोंडीवली आणि शिवगावाला पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. सिंचनासाठी या धरणातील पाण्याचा वापर केला जात नसल्याने धरणातील पाणी बहुतांश शिल्लक राहते. सध्या या धरणाची ३.३०६ दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता असून धरणात ३.२३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

यावर्षी आम्हाला मुबलक पाणी मिळेल, अशी स्थिती आहे. गतवर्षी धरणाच्या बंधाऱ्याला गळती लागल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. ती वेळ यावर्षी येणार नाही.

-अक्षरा कापसे, ग्रामस्थ, कोंडीवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.