भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यावर आला, अन् जीवाला मुकला

leopard death insuli konkan sindhudurg
leopard death insuli konkan sindhudurg
Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) - झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली कावळेकोंड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. स्थानिकांनी जखमी बिबट्याला पाहताच याची कल्पना वनविभागाला दिली. त्यानुसार दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, माजगाव वनपाल प्रमोद सावंत, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आंबोली वनक्षेत्रपाल जाधव, वनरक्षक संग्राम पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ अचानक रस्त्यावर आल्याने भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. त्याही स्थितीत बिबट्याने रस्त्यालगत असलेल्या शिर्के यांच्या बागायतीत आसरा घेतला. तेथे मोठा रक्तस्राव झाला. स्थानिकांनी पाहिल्यानंतर बिबट्याला पिण्यासाठी पाणी दिले. तसेच, तत्काळ याची कल्पना वनविभागाला दिली. 

जखमी बिबट्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांनी उपचार केलेत. मात्र, बिबट्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तासाभरानंतर बिबट्याचा मृत्यू झाला. डॉ. ठाकूर यांनी शवविच्छेदन केले. वाहनाच्या धडकेत डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. वनविभागाने पंचनामा करून सावंतवाडी येथील उपरलकर डेपोत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.