चिपळूण ( रत्नागिरी ) - येथील इंदिरा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते लियाकत शाह यांची चिपळूण काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. विविध सामाजिक समस्यांवर भिडणारा कार्यकर्ता म्हणून शाह यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी संघर्षाची झलक दाखवून दिली होती. आगामी कालावधीत काँग्रेसचा प्रभाव वाढविण्यावर आपला भर राहील, असे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शाह यांनी सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांनी शाह यांना निवडीचे पत्र दिले. शहरात कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळण्यासाठी आपण नियमित प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित शहराध्यक्षांनी निवडीनंतर सांगितले.
हेही वाचा - सिंधुदुर्गातील दादागिरीवर उदय सामंत म्हणाले,
ते म्हणाले, पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू. काँग्रेसला ऊर्जितावस्था आणण्याचे काम देखील शहराध्यक्ष पदाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आगामी कालावधीत शहराची नूतन कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. शहरात पक्षाची चांगली ताकद आहे. सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने पक्ष बळकट करण्यावर भर दिला जाईल. पक्ष विस्तारासाठी शहरात विविध विधायक उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. येथील पालिकेत माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या लियाकत शाह इंदिरा कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. ते अद्याप निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा - उदय सामंत म्हणाले, कणकवलीबाबत आमचं ठरलंय
2011 ला पालिकेत ते पोटनिवडणुकीच्या माध्यमातून निवडून गेले. त्यानंतर 2014 ला पुन्हा नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष होण्याची किमया त्यांनी केली होती. तसेच 2019 मध्ये झालेल्या चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आणण्यात मोलाची कामगिरीदेखील त्यांनी केली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेकदा पक्षाच्या हितासाठी अनेकांशी संघर्ष देखील केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.